फोटो पी १८ चांदूर बाजार
तळवेल : चांदूर बाजार तालुक्यातील खरीप हंगामातील पेरण्या जवळपास पूर्णपणे आटोपल्या आहेत. या वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्या लवकरच आटोपल्या. परंतु, रविवारी अचानक मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदूर बाजार तालुक्यामध्ये जवळपास तूर पिकाचा पेरा जास्त आहे. पावसाचे पाणी साचल्याने तूर पीक जळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
चांदूर बाजार तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, संत्रा, ज्वारी, मूग, उडीद, ऊस इतर यांसारख्या अनेक पिकांची लागवड करण्यात आली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८.०४ हेक्टर असून, त्यामधील पेरणीयोग्य क्षेत्रफळ ५९ हजार २.९५ हेक्टर आहे. रविवारी अचानक मुसळधार पावसाने आगमन झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक हेक्टर क्षेत्रफळ पाण्याखाली गेले आहे. अशा स्थितीत तूर पीक जाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
फोटो पी १८ साऊर
भातकुली तालुक्यातील साऊर पाण्यात
टाकरखेडा संभू : रविवारी दुपारी १.४५ ते २.४५ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतासह साऊर ते टाकरखेडा रोडवरदेखील तलाव साचला होता. गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नाला तुडुंब भरून वाहिला. साऊर येथील अनिल तिडके यांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने वर्षभराचे कुटार खराब झाले. अमरावती तालुक्यातील रोहनखेड पर्वतापूर येथे दमदार पाऊस कोसळल्याने गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आला. ते पुराचे पाणी गावात शिरले.