लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटात सध्या गोरगरीब आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून शासनातर्फे कोट्यवधींचा रोजगार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला. परंतु, रोजगार हमी योजना राबवणारी यंत्रणा पूर्णपणे तथाकथित कंत्राटदार आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधली गेल्याने शासनाची आदिवासी विकासपूरक योजना फसवी ठरली आहे. अनेक ठिकाणी अकुशल कामे न करता थेट कुशल कामे राबविण्यात आलीत. ही कामे ग्रामपंचायत यंत्रणेकडून राबविण्यात येत असून, त्यावर तांत्रिक सहायक, रोजगार सहायक यांच्या संगनमताने अनेक गैरप्रकार पुढे आले आहेत.नियमाप्रमाणे मनरेगा अंतर्गत पांदण रस्ते तयार करताना काळ्या मातीच्या जमिनीवर अकुशल कामे नोंदणीकृत मजुरांकडून करण्याचे शासकीय नियम आहे. अकुशल कामे झाल्यानंतर कुशल कामे करण्याचे सर्वसाधारण नियम असताना, याकडे ग्रामपंचायतींनी साफ दुर्लक्ष करून थेट कुशल कामे राबविण्याचे षड्यंत्र रचले आहे. या कामात तथाकथित कंत्राटदार हे ग्रामपंचायतींना सहायकाची भूमिका वठवून लाखो रुपयांची थातूर-मातूर कामे करीत आहेत.दरम्यान धारणी तालुका पत्रकार संघातर्फे अध्यक्ष दीपक मालवीय आणि उपाध्यक्ष दुर्गा बिसंदरे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नुकतेच निवेदन सादर केले. या निवेदनावर जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीही रोहयोचा भ्रष्टाचार येथे उघडकीस आला होता.
मेळघाटात ‘मनरेगा’मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:34 AM
मेळघाटात सध्या गोरगरीब आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून शासनातर्फे कोट्यवधींचा रोजगार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला.
ठळक मुद्देयोजना फसवी : अकुशल कामे न करता २० कोटींची देयके काढण्याची धडपड