मनीष तसरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी आता अगदी तीन दिवसांवर आहे. त्यानिमित्त जिल्ह्याच्या मुख्यालयी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे चौकाचौकांत वाहनांची व परिणामी नागरिकांची कोंडी होत असल्याचे चित्र शहरात निदर्शनास आले आहे.अमरावती शहरातील राजकमल चौकापासून थेट इतवारा बाजारापर्यंत बाजारपेठ विस्तारली आहे. या बाजारपेठेला परतवाडा, दर्यापूर शहराकडे शहराकडे नेणारा वलगाव मार्ग आहे. नेमके याच ठिकाणी टांगा पाडाव येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक कोंडी होते. एरवी वर्षाच्या कोणत्याही दिवशी ही वाहतूककोंडी कायम असते.दरम्यान, शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशानुसार वाहतूक कर्मचारी आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे फिक्स पॉईट लावण्यात आले आहेत.अंबादेवी मंदिरामुळे गांधी चौक परिसरात वाहतूककोंडी अनुभवास येते. सण-उत्सव काळात लागणाऱ्या हातगाड्या, साहित्य विक्री दुकाने डोकेदुखी ठरत आहेत.उपाय : गांधी चौकात खरेदीसाठी थांबणाऱ्या वाहनांकरिता अंबादेवी मंदिर संस्थानचे पार्किंग स्थळ आहे. त्याबाबत वाहतूक पोलिसांना आग्रह करावा लागेल.उपाय : परिसरात व्यापारी संकुलांमध्ये पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्यावर गाड्या लागतात. याबाबत प्रशासनाला समन्वयातून तोडगा काढावा.
अमरावती शहरवासीयांच्या गर्दीने केली कोंडी; दिवाळीआधीच प्रदुषणात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 5:00 AM
मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दिवाळी आता अगदी तीन दिवसांवर आहे. त्यानिमित्त जिल्ह्याच्या मुख्यालयी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी ...
ठळक मुद्देवाहनांच्या दुतर्फा रांगा, पार्किंग सुविधेचा अभाव, पोलिसांची सणानिमित्त उपाययोजना