चिखलदरा (अमरावती) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी दहा हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. दाट धुके, रिमझिम अन् क्षणात मुसळधार पडणारा पाऊस, हिरवा शालू पांघरलेले गगनभेदी उंच पहाड, त्यातून कोसळणारे धबधबे असा पर्यटकांना आकर्षित करणारा नजारा असल्याने विदर्भ, राज्यासह मध्यप्रदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटनस्थळावर गत महिन्याभरापासून पर्यटकांनी शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक चिखलदराला भेट देतात. रविवारी दहा हजारांवर पर्यटकांनी येथील विविध प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली. येथील महाभारतकालीन भीमकुंड, आदिवासींचे कुलदैवत देवी पॉइंट, नौकाविहार, गाविलगड किल्ला, सादाला प्रतिसाद देणारा पंचबोल, हरिकेन पॉइंट, जंगल सफारी या ठिकाणांना पर्यटकांनी पहिली पसंती दर्शविली. पर्यटकांची गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.
दाट धुके आणि रिमझिम पावसात मस्तीचिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांची पहिली पसंत शुभ्र दाट धुके आणि पावसाळ्यात कोसळणाºया धबधब्यांना असते. अलीकडेच पर्यटनस्थळावर मुसळधार पाऊस झाला. रविवारपर्यंत ६६० मिमीची नोंद अप्पर प्लेटो येथील जलमापन केंद्रावर झाली. गतवर्षी ५०३ मिमीची नोंद होती.
दहा हजारांवर पर्यटक, हॉटेल व्यावसायिकांकडून लूट,शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांत पर्यटकांची पावले नंदनवनाकडे वळू लागली आहेत. रविवारी दहा हजारांवर पर्यटकांनी ८०० पेक्षा अधिक वाहनांत येऊन निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद लुटला. चिखलदरा नगरपालिकेच्या पर्यटक करवसुली नाक्यावर पाऊण लाखाहून अधिक महसूल गोळा झाला. येथील काही हॉटेल व्यवसायिकांनी खोल्यांचे दर अचानक अव्वाच्या सव्वा वाढविल्याने पर्यटकांमध्ये मात्र नाराजीचा सूर पसरला आहे. त्यावर निर्बंध लावण्याची मागणीही करण्यात येत आहे
मंत्री आमदारांच्या नावावर इतरांची धूमचिखलदरा पर्यटनस्थळावरील शासकीय विश्रामगृहामध्ये आरक्षण मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे आमदार, खासदार, मंत्र्यांच्या नावाची पत्रे लावून नातेवाईक आणि इतरांची धूम सुरू आहे. थेट दादागिरीची भाषा सुरू असल्यामुळे शासकीय विश्रामगृहाचे अधिकारी-कर्मचारी कमालीचे दहशतीखाली आले आहेत.