लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वरात महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवभक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. ‘हर हर महादेव’च्या गजराने परिसर दुमदमून गेला होता. लाखावर दर्शनार्थी कोंडेश्वर येथे महादेवाच्या चरणी लीन झाले.पहाटे ५ वाजता अभिषेकानंतर कोंडेश्वर मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले. देवस्थानला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसफेऱ्या उपलब्ध केल्या. प्राचीन हेमाडपंथी मंदिरामुळे श्रीक्षेत्र कोंडेश्वराची महती दूरपर्यंत पोहोचली आहे.दिवसभरात भाविक कुटुंबीयांसह येथे पोहोचत होते. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.दारू बंदीचा प्रचार आरोग्यसेवा बूथश्रीक्षेत्र कोंडेश्वर यात्रेत फिरती दारूबंदी प्रचार मोहीम राबविण्यात आली. अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व संस्थांकडून आरोग्यसेवा बूथ होते. बडनेरा ते कोंडेश्वर मार्गालगत सामाजिक संघटनांकडून नि:शुल्क फराळ, फळांचे वाटप करण्यात आले. मोफत चरणसेवा स्टॉल उभारले होते.
कोंडेश्वरला अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
पहाटे ५ वाजता अभिषेकानंतर कोंडेश्वर मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले. देवस्थानला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसफेऱ्या उपलब्ध केल्या. प्राचीन हेमाडपंथी मंदिरामुळे श्रीक्षेत्र कोंडेश्वराची महती दूरपर्यंत पोहोचली आहे. दिवसभरात भाविक कुटुंबीयांसह येथे पोहोचत होते. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
ठळक मुद्देलाखावर दर्शनार्थी : ‘हर हर महादेव’चा गजर