शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

पहिल्याच दिवशी जीवनावश्यक वस्तूसांठी मार्केटमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 5:00 AM

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाव्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती.

ठळक मुद्देसंचारबंदीत सकाळी ११ पर्यंत शिथिलता, विनाकारण फिरणाऱ्यांवर ‘वाॅच’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. प्रशासनाद्वारे प्रमुख चौकांत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात आला. काही ठिकाणी अशा व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करताना दिसून आले.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाव्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती. काही व्यापारी संकुलाच्या आतील भागातील दुकाने सुरू असलेली आढळून आली. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकांद्वारे अशा काही दुकांनावर कारवाया करण्यात आल्या. महापालिका आयुक्त, उपायुक्त, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांनी प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चित्रा चौक व इतवारा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व पथकांना आवश्यक ते निर्देश दिले.चित्रा चौक, भाजीबाजारात चाचणीनागरिकांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या चित्रा चौक, इतवारा भागात भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांच्या महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. महापालिका व पोलीस पथक रस्ते व दुकांनामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेताना आढळले. सकाळी ११ नंतर उघडी असलेल्या दुकांनांच्या संचालकांना तंबी देऊन बंद करण्यास फर्मावण्यात आले.

हातगाड्यांना पथकाचा मज्जावशहरात भाजीविक्रेत्यांना झोननिहाय जागा देण्यात आलेल्या असल्याने रस्त्यावर भाजीपाल्याच्या हातगाड्या लावण्यास महापालिकेच्या पथकाद्वारे मनाई करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने व अंतर्गत भागात हातगाडी विक्रेता दिसल्यास त्याला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. याशिवाय या विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करण्याविषयी सांगण्यात आले.

११ नंतर फिरण्यास नागरिकांना मनाईसकाळी ११ नंतर संचारबंदी लागू होत असल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना हटकण्यात आले. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. विहित कालावधीनंतर सुरू असणाऱ्या दुकानांबाबत महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनीदेखील तंबी देऊन ती दुकानदारांना बंद करायला लावल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार