शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मेळघाटात आजारी बालकाच्या पोटावर गरम विळ्याचे 'डंबे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 7:00 AM

पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकीस आला.

ठळक मुद्देमेळघाटात अघोरी कृत्यचिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकीस आला. या घटनेमुळे मेळघाटात अंधश्रद्धेचा पगडा अजूनही घट्ट असल्याचे दिसून आले. दोन महिन्यंतील ही चौथी घटना आहे. दुसरीकडे सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांनी त्या बालकाचा मृत्यू झाल्याच्या दशाभूल करणारे वृत्त प्रसारित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

दिवेश राजू अखंडे (२ वर्षे, रा.लवादा) असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याला २५ किलोमीटर अंतरावरील सेमाडोह येथील भूमकाने गरम विळ्याचे चटके दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली. यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बालकाला डंबे दिल्यानंतर गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

अघोरी प्रथेचा पगडा भारीजून महिन्यात तीन मुलांच्या पोटावर गरम विळ्याने पोटावर डंबा देण्यात आल्याचा प्रकार लोकमतने उघड केला होता. त्यानंतर पुन्हा ही अघोरी प्रथा मेळघाटात सुरूच आहे. अंधश्रद्धेतून पोटफुगीवर हे डंबे दिले गेले. तालुक्यातील बिहाली उपकेंद्रांतर्गत असलेल्या लवादा गावातील या दोन वर्षांच्या चिमुकल्याला रुग्णालयात नेण्याऐवजी सेमाडोह येथे भूमकाकडे पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी दिली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर मृत्यूच्या बातम्यापोटावर डंबे दिलेल्या त्या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांनी सकाळपासून झळकल्या. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या. प्रत्यक्षात लोकमतने माहिती घेतली असता, तो चिमुकला सुस्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या पालकांनी नागपूरला जाण्यास नकार दिल्याने येथेच त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.बालकावर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. त्याचे आई-वडील तेथे आहेत. सेमाडोह येथे भूमकाकडे जाऊन डंबे घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावरून शोध घेऊन पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरू आहे.- सतीश प्रधानतालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

टॅग्स :Healthआरोग्य