अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने दसरा, दिवाळी सण लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३० फेऱ्या या कालावधीत असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (गाडी क्रमांक ०२१३९) २० फेऱ्या असणार आहे. १० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सोमवारी आणि गुरूवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२१४० सुपरफास्ट स्पेशल २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. एकूण १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन आहे.
नागपूर - पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (गाडी क्रमांक ०२१४४) या रेल्वे गाडीच्या १० फेऱ्या धावणार आहे. १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल ही २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेबर २०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन असे डबे जोडण्यात आले आहे. या विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग १४ ऑक्टोबर पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्र स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.