फोटो जे-१८-इर्विन रुग्णालय
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्णांची आवक असून, गरजेनुसार सीटी स्कॅन आणि एक्स-रेची व्यवस्था असली तरी तांत्रिक अडचणींमुळे तपासणीकरिता येथील रुग्णांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
अमरावती जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज ३०० च्या आसपास रुग्ण तपासणी होत आहे. येथील सीटी स्कॅन व एक्स-रे मशीन नियमित असली तरी कधी काळ्या फिल्मसाठी रुग्णांना तासंतास ताटकळत बसावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. सीटी स्कॅन मशीन गतवर्षी कित्येक महिने बंद राहिल्याने रुग्णांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात पाठविले जायचे. लोकप्रतिनिधींनी प्रश्न उचलून धरल्यानंतर कारागीरला बोलावून ती पूर्ववत करण्यात आली. एमआरआय मशीनची सुविधा केव्हा मिळणार, असा प्रश्न रुग्णांकडून केला जात आहे.
बॉक्स
जिल्ह्यात १७ एक्स-रे मशीन्सजिल्हा सामान्य रुग्णालयात व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन आहेत. १४ तालुक्यांसह चुरणी, सुपर स्पेशालिटी व जिल्हा स्त्री रुग्णालयांत एकूण १७ एक्स-रे मशीन्स आहेत. तसेच सात ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स आहेत. याद्वारा एप्रिल ते डिसेंबर दरम्यान २२ हजार ६४० तपासणी झाली, तर सोनोग्राफीच्या ९४२७ आणि २३७५ सीटी स्कॅन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत दोन सीटी स्कॅन, सात सोनाग्राफी (यूएसजी), १७ एक्स-रे मशीन्स आहेत. सर्व सुरळीत आहेत. दररोज ३०० वर ओपीडीचे रुग्ण येत असून, अन्य तपासणीदेखील नियिमत सुरू आहे. - श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
येथील डॉक्टरांनी उपचारासंबंधी योग्य सल्ला दिला. त्यानुसार चिठ्ठी घेऊल्सकाळी ९ वाजता एक्स-रे मशीनकडे गेलो. परंतु, तेथे काळी फिल्म उपलब्ध नसल्याचे सांगून दोन वाजेपर्यंत बसवून ठेवले. यात मी एकटाच नव्हतो, तर तब्बल ५० रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे येथील सेवा असमाधानकारक वाटली.
- गौतम खंडारे,
रुग्ण, अमरावती
एसटी बस अपघातात रविवारी रात्री गंभीर जखमी झालो. वरूडहून जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रुग्णावहिकेत सुखरूप पोहचविण्यात आले. येथील डॉक्टरांनी चांगला उपचार केला. पुढीलही उपचार येथेच केला असता, परंतु गाव बरेच लांब असल्याने परवडत नाही. त्यामुळे वरूडला पुढील उपचार घेईन.
- विजय वाघमारे,
रुग्ण, जरूड, ता. वरूड