इंदल चव्हाण-अमरावती : श्रावण महिला सुरू झाल्यामुळे उपवासाच्या पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भगरचे दर वधारले आहे. उपवासात साबुदाण्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. त्यामुळे शेंगदाणे, भगर, बटाटा, आलू चिप्स, गोड पदार्थ नायलॉन साबुदाणा, साबुदाण्याचाही वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र, साबुदाणा पचनास अवघड जात असल्याने उपवासात त्याचा वापर न केलेलाच बरा, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
बॉक्स
उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो)
भगर : १० जुलै - ११०१०
ऑगस्ट - १३०
साबुदाणा : १० जुलै - ५०
१० ऑगस्ट - ६०
नायलॉन साबुदाणा : १० जुलै ६५ - ऑगस्ट -७५
--
दर का वाढले?
भगर, साबुदाणा, शेंगदाना, खजूर यांची आवक गुजरात, तामिळनाडू व नाशिक येथून होते. मात्र, पूरस्थितीमुळे मालांची आवक होऊ शकली नाही. परिणामी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने या वस्तूंचे दर जुलै महिन्याच्या तुलनेत वधारल्याचे भारसाकळे प्रोव्हिजनचे संचालक मनोहर भारसाकळे यांनी सांगितले.
--
उपवास आहे, मग हे पदार्थ खा।
कोट
उपवासात पचनास हलके असे पदार्थ सेवन करावे. जसे फळ, भाज्या-फळांचा रस सेवन केल्यास त्यातून प्रोटीन्स, व्हिटॅमीन मिळते. त्यामुळे आतील विशाक्त द्रव बाहेर काढण्यास मदत होते. मात्र, कच्चा साबुदाणा खाण्यात आल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ते पचन होण्यास जड जात असून, हृदयरोगासंबंधित आजार उद्भवू शकतात.
डॉ. रसिका राजनेकर,
आहारतज्ज्ञ, रिम्स हॉस्पिटल
--
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी साबुदाणा खाऊच नये. साबुदाण्याचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास वजन वाढते.
साबुदाणा वापरायचाच असल्यास तो सुका असावा. कच्चा साबुदाणा पोटात गेल्यानंतर विषाक्त होऊन किडनीचाही आजार होऊ शकतो.
दुकानातून खरेदी करताना साबुदाणा सुका असल्याची खात्री करावी. ओलसर साबुदाणा खाण्यात आल्यास ते शरीराला बाधा पोचविते.