रस्ते दुभाजकावर वाढले गवत
(फोटो)
अमरावती : पावसामुळे सध्या रस्ते दुभाजकांवर गवत वाढले आहे. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे तेथे लावण्यात आलेली झाडे दबली व इतरच वाढल्याचे दिसून येते.
--------------------------
आठवडाभर पावसाचा मुक्काम
अमरावती: जिल्ह्यात ९ जुलैपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतींची कामे खोळंबली आहेत. आणखी आठ दिवस पाऊस राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
-----------------------------
संक्रमनमुक्तचा दर उच्चांकी
(फोटो)
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने संक्रमनमुक्तचा दर वाढला आहे. सध्या ९४,८५६ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत, ही९८.२९ टक्केवारी आहे.
---------------------------
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव
अमरावती : सोन आठवड्यांपासून पाऊस सुरु असल्याने सोयाबीनवे खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वेलीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
-------------------
कीटकजन्य आजारांमध्ये वाढ
अमरावती : पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने किटकजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे.