आॅनलाईन लोकमतअमरावती : बँक खात्यातून थेट पैसे चोरले जाण्याचा सिलसिला मे महिन्यापासून शहरात सुरू आहे. मात्र, अद्यापही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आरोपींचा धांडोळा घेण्यात येत असला तरी २० घटनांनंतरही या चोरीचा गुंता सुटला नसल्याने सायबर गुन्हेगार पोलिसांवर वरचढ ठरल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.सायबर गुन्हेगारांनी खातेदारांंचे पैसे चोरलेत तरी कसे, हे पोलिसांसाठी तूर्तास अनुत्तरित आहे. सीसीटीव्हीत आढळलेल्या संशयित नागरिकांनी खातेदारांचा डेटा कसा चोरला, ही बाब अद्यापही स्पष्ट होऊ शकली नाही. शहरात वारंवार घडणाºया या चोरीच्या घटना सायबर गुन्ह्यांशी संबधित असल्याने या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला. तथापि चार ते पाच महिन्यापासून सायबर सेलला या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढता आली नाही. बँक खात्यातील रक्कम चोरीला गेल्याने अनेक खातेदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कौटुंबिक कलह सुरू झालेत. या गुन्ह्यांचा तपास करणारी सायबर यंत्रणा अद्यापही शक्यता आणि जर-तरच्या गुंत्यात अडकल्याने तपासाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. सायबर पोलिसांच्या तुलनेत चोरटे हायटेक झालेत, हे वास्तवही यानिमित्ताने उघड झाले.सायबर ठाणेही नावापुरतेचसायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आयुक्तालयात स्वतंत्र सायबर ठाणे उभारण्यात आले. तथापि, ते दोन महिन्यांपासून कार्यान्वित करण्यात आलेले नाही. सर्व हायटेक सुविधा उपलब्ध असणाºया या ठाण्याचा मुहूर्त केव्हा निघणार, याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.लॉजकडे दुर्लक्षसायबर गुन्हेगार हे लॉजमध्ये राहिले असावेत, अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे मे महिन्यापासून लॉजवर राहणाऱ्यांची माहिती पोलिसांनी मागविली होती. मात्र, अद्यापपर्यंत लॉजची किंवा तेथील सीसीटीव्ही तपासण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.बँक खात्यातून रक्कम चोरीला जाण्याच्या घटनांचा सुक्ष्म तपास सायबर सेल करीत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर पोलीस पॉझिटिव्ह लाइनवर आहे.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.
पोलिसांपेक्षा सायबर गुन्हेगार वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:00 PM
बँक खात्यातून थेट पैसे चोरले जाण्याचा सिलसिला मे महिन्यापासून शहरात सुरू आहे.
ठळक मुद्देहायटेक प्रणाली निरुपयोगी : आरोपींना अटक केव्हा?