लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साईनगर स्थित साईकृपा कॉलनीत रविवारी सायंकाळी ७ वाजता झालेल्या गॅस सिलिंडरच्या भडक्याने प्रंचड खळबळ उडाली. या आगीनंतर भडकलेला सिलिंडर उचलून बाहेर फेकताना घरमालक प्रवीण पांडूरंग बनकर (रा.साईकृपा कॉलनी) यांचा हात भाजल्या गेला. अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळाविल्याने मोठा अनर्थ टळला.साईकृपा कॉलनीतील रहिवासी प्रवीण बनकर यांनी रविवारी सकाळी गॅस सिलिंडर आणले होते. सायंकाळी खासगी नोकरीवरून घरी परतल्यानंतर ते व त्यांचे वडील घरात टीव्ही पाहत बसले होते. दरम्यान, स्वयंपाक खोलीतून अचानक गॅस सिलिंडरच्या भडक्याचा आवाज झाला. त्यांनी स्वयंपाक खोलीत जाऊन बघितले असता, सिलिंडरमधून आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती अग्निशमनला दिली. दरम्यान, त्यांनी भडका घेतलेल्या सिलिंडरची आग विझविण्याचे प्रयत्न केला. प्रवीण यांनी सिलिंंडरला बाहेरच्या आवारात फेकले. त्यावेळी त्यांचा हात किरकोळ भाजल्या गेला. अग्निशमनचे फायरमन विशाल भगत, मनीष उताणे, हिवराळे व चालक मुरली घारडे यांनी घटनास्थळी पोहोचवून तत्काळ सिलिंडरची आग विझविली. मात्र, गॅस गळती सुरू असल्यामुळे अन्यत्र आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांनी गळती सुरू असलेले गॅस सिलिंंडर तत्काळ मोकळ्या जागेत नेले. त्यानंतर ती गळती बंद केली. दरम्यान, तेथील नागरिकांना वीज दिवे बंद करण्यास सांगण्यात आले होते. या आगीच्या घटनेत प्रवीण बनकर यांच्या स्वयंपाक खोलीतील काही साहित्य जळून खाक झाले होते. आग नियंत्रणात आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
सिलिंडरच्या भडक्याने साईकृपा कॉलनीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:07 PM
साईनगर स्थित साईकृपा कॉलनीत रविवारी सायंकाळी ७ वाजता झालेल्या गॅस सिलिंडरच्या भडक्याने प्रंचड खळबळ उडाली. या आगीनंतर भडकलेला सिलिंडर उचलून बाहेर फेकताना घरमालक प्रवीण पांडूरंग बनकर (रा.साईकृपा कॉलनी) यांचा हात भाजल्या गेला. अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळाविल्याने मोठा अनर्थ टळला.
ठळक मुद्देघरमालक किरकोळ जखमी : अग्निशमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला