लोकमत न्यूज नेटवर्कवनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव परिसराला शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. यावेळी एक भले मोठे झाड ट्रॅक्टरवर कोसळून वाहनाचे नुकसान झाले. काही घरांवरील टिनाचे छत उडाले. शिवारात संत्र्याच्या व कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.धनेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता सोसाट्याचा वारा सुरू झाला. रात्री ९.३० च्या सुमारास त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुमारे तासभराच्या वादळात गावातील मोठे वृक्ष जमिनीवर कोसळले. गावातील अनेकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले. शेतकरी बाबूराव गायगोले यांच्या ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने वाहनाचे बरेच नुकसान झाले. वादळामुळे मोकळ्या जागेत बांधलेल्या बऱ्याच पाळीव पशुंना दुखापत झाली आहे. सिंचन मोठ्या प्रमाणात असलेल्या धनेगावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात कांद्याचा ढीग लागला आहे. अचानक आलेल्या वादळाने व पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. संत्राबागांतील आंबिया बहर हवेने जमिनीवर आला आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाने योग्य मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही माहिती धडकताच आ. बळवंत वानखडे यांनी तालुका प्रशासनाला सर्वेक्षणाचे निर्देश दिले.नुकसानग्रस्त भागाचा पंचनामाजिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, प्रमोद दाळू, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, विकास येवले, बबलू काळमेघ, प्रदीप येवले, अजय येवले, देवानंद गायगोले, विजय येवले, मुकुंदराव येवले, हेमराज गायगोले, सरपंच किशोर येवले, उपसरपंच संजय मेढे यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी केली. कृषी अधिकारी किरण मुळे यांनी गावात दाखल होऊन पंचनामा केला.
धनेगाव परिसराला चक्रीवादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:00 AM
धनेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता सोसाट्याचा वारा सुरू झाला. रात्री ९.३० च्या सुमारास त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुमारे तासभराच्या वादळात गावातील मोठे वृक्ष जमिनीवर कोसळले. गावातील अनेकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले. शेतकरी बाबूराव गायगोले यांच्या ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने वाहनाचे बरेच नुकसान झाले. वादळामुळे मोकळ्या जागेत बांधलेल्या बऱ्याच पाळीव पशुंना दुखापत झाली आहे.
ठळक मुद्देट्रॅक्टरवर कोसळले झाड : टिनाचे छत उडाले, उघड्यावर बांधलेल्या जनावरांना दुखापत