चांदूरबाजार, रिद्धपूर : येथील चांदूरबाजार मार्गावरील सूत गिरणीनजीक शकुंतला केशवराव ठाकरे या ६५ वर्षीय वृध्दा बुधवारी रात्री ८ च्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारच्या बबिता प्रकाशराव कावळ या १५ वर्षीय मुलीच्या दोन्ही हाताला दुखापत झाली. यातून निघालेल्या आगीच्या डोंबांनी शेजारच्या पाच घरांना वेढले होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.शकुंतला ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात तिच्या डावे हाताला जखम झाली. या स्फोटाने घरात आग पसरली. त्यात घरातील टीव्ही, डीव्हीडी, सायकल जळून खाक झाली. लखन खोतकर, यांचे हजारो रुपयांचे कुटार, प्रकाश कावळे यांच्या घरातील ८ पोते गहू, १५ हजारांची रोकड, चार बंडी कुटार, पंखा सोन्याचे डोरले १० गॅ्रम, मोबाईल जळून खाक झाले. शंकरराव धुर्वे यांच्या घरातील कुटार, दोन बकऱ्या जळाल्या, हिरालाल उईके यांचे कुटार पाच हजारांची रोकड व कपडे जळाले. श्रीधर शेवलीकर यांच्या घरातील २ पोते गहू, मंगळसूत्र (एकदाणी) ८ ग्रॅम, आगीच्या भक्षस्थानी पडले. माहिती मिळताच मोर्शी व चांदूरबाजाराच्या अग्नीशमन दल रिध्दपूर येथे पोहोचले. त्यामुळे आग आटोक्यात आली. मोर्शीचे तहसीलदार माळवी व रिध्दपूरच्या तलाठ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला .
रिद्धपुरात सिलिंडरचा स्फोट
By admin | Published: April 24, 2015 12:15 AM