सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. बुधवारी सायंकाळी गोकुळपुरीत झालेल्या दहीहंडी सोहळ्याला सुमारे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीला पंढरपूरला सासरी गेलेल्या रुक्मिणीच्या पालखीचे व त्यासोबत परतलेल्या वारकऱ्यांचे स्वागत संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी केले. तत्पूर्वी, पहाटे ६ वाजता संध्या वानखडे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा पार पडली. सकाळी ११ कौंडण्यपूरला पालखी दाखल झाली. सर्व भाविकांनी वर्धा नदीपात्रात स्नान केले. यानंतर हभप सचिनदेव महाराज यांचे प्रवचन आणि हभप मोहनीबाबा यांचे काल्याचे कीर्तन आटोपले. दहीहंडीसाठी थांबलेल्या भाविकांनी दिवसभर प्रवचनाचा लाभ घेतला. दुपारी २ ते ४ या वेळेत काल्याचे कीर्तन झाले. यानंतर दहीहंडीसाठी भाविक गोकुळपुरीत पोहोचले. दहीहंडीचे पूजन व दहीतीर्थाचे भाविकांना वाटप करून सायंकाळी सुरुवात झाली. दहीहंडीचे पूजन सर्जेराव देशमुख महाराज व अतुल ठाकरे यांच्या हस्ते झाले. सोहळ्याला भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी (दिघडे), पंचायत सभापती अर्चना वेरूळकर, युवा स्वाभिमानचे धीरज केने, आशिष लांडे, आसावरी देशमुख आदी उपस्थित होते.पहाटेपासून भाविकांचा मेळापाडव्याला आषाढी एकादशीची समाप्ती व दहीहंडी असल्याने भाविक पहाटेपासून दाखल झाले होते. वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या मंदिरात दिवसभर रुक्मिणीचे दर्शनासाठी रांग लागली होती. यात महिला मंडळीची संख्या अधिक होती. विठ्ठल-रुक्मिणी संस्थानने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. ठाणेदार सचिन जाधव यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला.
कौंडण्यपुरात दहीहंडीला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:31 PM
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. बुधवारी सायंकाळी गोकुळपुरीत झालेल्या दहीहंडी सोहळ्याला सुमारे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देविठ्ठलाचा गजर : पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे जंगी स्वागत