आंदोलन : शासनाच्या निर्बधाविरोधात रोष
अमरावती : शासनाच्या निर्बंधाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहीहंडी फोडून हिंदू सण विरोधी सरकारचा निषेध केला.
शासनाने लावलेले हिंदू सणांवरील बंदी उठवावी. तिघाडी सरकारचा निषेध असो, हिंदू विरोधी सरकारचा निषेध असो, हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की, बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. राजकीय पक्षांच्या यात्रा पक्षीय कार्यक्रम यांना गर्दी चालते. परंतु हिंदू सणांमध्ये सरकारला कोरोना दिसतो का, असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असताना मंदिरे बंद आहेत. सण उत्सवावर निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने या विरोधात सर्वसामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. हिंदूंच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, या उद्देशाने मनसेच्यावतीने ही दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी मनसे महानगराध्यक्ष संतोष बद्रे, जनहित कक्ष शहर अध्यक्ष प्रवीण डांगे, शहराध्यक्ष गौरव बांते, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धिरज तायडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रावेल गिरी, विक्की थेटे, वेदांत तालन, मनविसे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे,शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर, सुरेश चव्हाण,नितेश शर्मा, अजय महल्ले, रुद्र तिवारी, सचिव बबलू आठवले, राजेश धोटे, राम काळमेघ, रोशन शिंदे, महिला सेना जिल्हाध्यक्ष रीना जुनघरे, शहराध्यक्ष वृंदा मुक्तेवार, छाया रायबोले, संगीता मडावी, वंदना खिलेकार, दितिका हिवलेकर, सोनल भुतडा, यामिनी अर्डक व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.