कृषी केद्रचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंजनगांव सुर्जी : कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास काळे यांचे सराय मौजे मधील आठ एकर शेतात दि.१७ जूनला पेरणी केलेलं सोयाबीन पिकावर फुलोरा स्थितीत फवारणी केली असता.संपुर्ण फुलोर जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असुन कापुसतळणी येथील सागर ॲग्रो सर्विस च्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहारचे उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांनी केली आहे.
फुलोरा अवस्थेत असलेल्या आठ एकर सोयाबीन पिकांवर फवारणीसाठी शेतकरी मधुकर काळे यांनी सागर अँग्रोमधुन किटकनाशाके घेतली आणी फवारणी केली. सात - आठ दिवसानंतर पिकाची पाहणी केली असता संपूर्ण फुलाची गळ झाल्याचे दिसून आले. ही बाब कीटकनाशक विक्रेता लक्ष्मीकांत राठी यांना सांगितले. परंतु श्री राठी यांनी सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आठ दिवस वेळ मारुण नेल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. औषध विक्रेता यांनी सदर औषध कंपनीला माहिती देऊन सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन उपाययोजना करणे अपेक्षित असतांना. किटकनाशक विक्रेत्यांनी तसे केले नाही यावर उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दि.२७/८/२०२१ ला निवेदन दिले आणि दि. ३/९/२०२१ पर्यंत सदर पिकाची पाहणी शास्त्रज्ञां करून दोषींवर कारवाई करणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 30 क्विंटल भरपाई मिळावी अशी मागणी करुण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक २/९/२०२१ ला समिती गठित करण्यात आली या समितीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकनाशक शास्त्रज्ञ कु. सोनल नागे, सदस्य तसेच एम .जी .कोरे (ता.कृ.अ.) सदस्य, ए.बी .राठोड (कृ.अ.प.स.) सदस्य सचिव, जी. आर. मोरे (कृ.अ.) एम .एम. जाधव(कृ.स.), तक्रार कर्ता अरुण शेवाणे, औषध विक्रेता लक्ष्मिकांत राठी , आदामा कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मोरे,पंच संजय हिंगे, प्रशांत सरदार, गजानन हरणे, शेतकरी सत्यम काळे आदींच्या समक्ष पाहणी झाली. समितीने क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रीन हे औषध सोयाबीन पिकासाठी शिफारशीत नसल्यामुळे सोयाबीन पिकाचा संपूर्ण फुलोऱ्याची गळ झाली आणि भविष्यात उत्पन्न होऊ शकणार नाही अशाप्रकारचा अहवाल दिला. म्हणून औषध विक्रेता व कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना 30 क्विंटल ची मदत मिळावी अशी मागणी तक्रार कर्ते अरुण शेवाणे व शेतकऱ्यांनी केली आहे.