चांदूर रेल्वे : सकाळी ७ वाजता योगा, आठ वाजता दुसरा क्लास आणि दिवसभर दिलेले काम करून पुन्हा सायंकाळी शिबिरार्थ्यांचे कला प्रदर्शन असा नित्य नेमात गेल्या पाच तारखेपासून स्थानिक पीपल्स कला मंचचे उन्हाळी नाट्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर सुरू असून या ऑनलाइन शिबिरात ग्रामीण आणि शहरी भागातील १२० च्या वर शिबिरार्थी रंगले आहे. नुकतेच कॅमेरा समोर डान्स, योगा आणि नाट्य अभिनयाने या शिबिराचा समारोप झाला.
पीपल्स कला मंचचे अध्यक्ष विवेक राऊत यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. मुंबई, नागपूर, पुणे, यासह गुजरातमधील शिबिरार्थ्यांचा यात सहभाग होता. शिबिराला मंगेश उल्हे, उज्ज्वल पंडेकर, दीपाली हटवार, अश्विनी गोरले, दीपाली बाभूळकर, पल्लवी सपकाळ, अनघा उंबलकर, प्रतिभा सोनालेकर, दीक्षा खांडेकर, प्रेरणा वानखडे, अनुज ठाकरे यांनी आतापर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन केले तर पीपल्स कला मंचचे सिद्धार्थ भोजने, मनीष हटवार, राहुल जगताप, अमर इमले, नीलेश मोहकार, पंकज कणसे, अंकुर धाकुलकर, मयूर शिदोडकर आदींनी समन्वयक म्हणून काम केले.
----------
गेल्या २२ वर्षांपासून दरवर्षी सातत्याने पीकेएम चे हे शिबिर अखंडित पणे सुरू आहे मागील वर्षी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून तर यावर्षी त्या पुढे जात गूगल मिट, झूमच्या माध्यमातून दिलेल्या वेळेला सर्व शिबिरार्थी एकत्र येत शिबिराचा आनंद घेत आहे. कोरोना काळात जिथे मुलं बंदिस्त घरात कंटाळले असताना या शिबिराच्या माध्यमातून ते विविध विषयांची माहिती घेत असून शिबिराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची प्रतिक्रिया शिबिर संचालक विवेक राऊत यांनी दिली आहे.
-----------
समारोपीय कार्यक्रमाला सर्व शिबिरार्थी आपापल्या घरी पूर्ण तयारीनिशी तयार झाले होते. कोणी डान्स तर कोणी नाट्याभिनय कोणी योगाचे धडे, कोणी भाषण, मिमिक्री, गीत गायन, कविता वाचन अशा अनेक कला त्यांनी सादर केल्या घरोघरी कॅमेरासमोर बसून पालकांनी प्रेक्षकांची तर शिबिरार्थ्यांनी आपल्यातील कलागुणाची चुणूक दाखविली.
===Photopath===
230521\1934-img-20210523-wa0035.jpg
===Caption===
photo