शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

सुरक्षारक्षकांच्या वाढीव संख्येवर दंडुका

By admin | Published: February 10, 2017 12:12 AM

महापालिका आयुक्तांनी बुधवारी पुन्हा ४४ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले. १ फेब्रुवारीला ३७ सुरक्षारक्षकांची कपात करण्यात आली होती.

आयुक्त आक्रमक : आणखी काहींची होणार गच्छंती अमरावती : महापालिका आयुक्तांनी बुधवारी पुन्हा ४४ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले. १ फेब्रुवारीला ३७ सुरक्षारक्षकांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे एकाच आठवड्यात सुरक्षारक्षकांच्या संख्येत ८१ ची कपात करण्यात आली. दबाव झुगारून करण्यात आलेल्या या कारवाईने महापालिकेच्या आस्थापना खर्चात महिन्याकाठी लाखो रूपयांची बचत होणार आहे.मे २०१६ मध्ये ‘अमृत’ या सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थेशी १४६ सुरक्षारक्षक पुरविण्याचा करारनामा उपायुक्त विनायक औगड यांच्याशी स्वाक्षरीनिशी करण्यात आला. मात्र, जानेवारी २०१७ अखेरपर्यंत सुरक्षारक्षकांच्या संख्येत अवाजवी वाढ करण्यात आली. स्मशानभूमी आणि बंद पडलेल्या जकात नाक्यासह जवाहरगेटच्या सौंदर्यीकरणावर अनेक सुरक्षारक्षक दाखविण्यात आलेत. महिन्याकाठी लक्षावधींचा खर्चअमरावती : प्रत्यक्षात तेथे त्यांची उपस्थिती व आवश्यकता लक्षात घेण्यात आली नाही. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने डोळे मिटून आणि हजेरी अहवाल न बघता फाईल्स चालविल्यात. हा सावळागोंधळ लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी दंडुका उगारत सुरक्षारक्षक आणि एकूणच कंत्राटीसेवेचा आढावा घेतला. अंतर्गत परिपत्रक काढत सर्व विभागप्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्थ विभागातील कंत्राटींच्या संख्यात्मक उजळणीचे निर्देश दिलेत. शनिवारी त्यासाठी बैठक घेऊन इतक्या मोठ्या संख्येत कंत्राटीची आवश्यकता आहे का, याबाबतची वस्तुस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली. दोन्ही उपायुक्तांनी त्यांच्या अधिनस्थ विभागात जाऊन कंत्राटींची संख्या जाणून घेऊन कपातीची संख्या आयुक्तांना कळविली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)