(असाईनमेंट)
अमरावती : जिल्ह्यात नदी-नाल्याच्या काठावर असलेली ४८१ गावे पूरप्रवण आहेत, या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी प्रशासनाद्वारे वेळोवेळी अलर्ट देण्यात येतो. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास संबंधित तालुक्यासह जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात ९ जुलैपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर संततधार पावसामुळे किमान ४०० गावे बाधित झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. या पावसाने धरणे ओव्हर-फ्लो झाल्याने गेट उघडण्यात आली. परिणामी नद्या प्रवाहित झाल्या व नदीकाढच्या गावांमध्ये पाणी शिरले. याशिवाय काठालगतची १० हजार हेक्टर शेतीही खरडली गेली. जिल्ह्यात सद्यस्थिती सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्यामुळे आगामी काळात या गावामंध्ये पुन्हा पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात वडाली, महादेव खोरी, छत्री तलाव, माताखिडकी, अंबा नालालगतची वस्ती, जोडमोड, लालखडी, चुनाभट्टी व नमुना भागात पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.
बॉक्स
तालुकानिहाय पूरप्रवण गावे
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ६३, तिवसा ४८, भातकुली ३४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५६, अचलपूर ५५, चांदूर बाजार २६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव २७, नांदगाव खंडेश्वर २४, मोर्शी ३८, वरूड ५१, धारणी ७ व चिखलदरा तालुक्यात निरंक आहे. याशिवाय अमरावती शहरातील १५ भागात पावसाच्या पाण्याचा धोका आहे.
बॉक्स
प्रशासनाचे तेच ते रडगाणे
पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीच घडतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला न जाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय धरणाचे गेट उघडल्यामुळेही नद्या प्रवाहित होतात. अनेकदा पुलाच्या पायलीला कचरा अटकतो. त्यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय नदीपात्रातील अतिक्रमणांमुळेही पुराचा धोका वाढतो.
बॉक्स
पाणी साचण्यांची कारणे
१) नदी-नाल्यांच्या पात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेकदा काठालगतची गावे, वस्त्यांमध्ये पाणी शिरते.
२) धरणांची गेट उघडण्यात आल्यामुळे नदी नाले प्रवाहित होतात व त्यामुळे काठालगतची गावे, वस्त्या व शेतांमध्ये नुकसान होते.
३) गावे व शहरामंध्ये पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सांडपाणी रस्त्यांवर येते.
कोट
पाऊस नको-नकोसा!
पावसामुळे आमच्या भातकुली तालुक्यातील नदी-नाल्यांंना पूर आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेरणी झालेले शेत खरडले. आम्ही नुकसानभरपाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
- रमेश वानखडे, शेतकरी
शहरात अनेक भागात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. ते उंच व आमचे घर ठेंगणे अशी स्थिती आहे. रस्त्यांचे पाणी व्यवस्थित बाहेर न काढल्यामुळे तुंबले व आमच्या घरात व लगतच्या संकुलांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याची स्थिती ओढावली.
संदीप ठाकरे, नागरिक