दीड वर्षापासून इमारती ओसाड ; वर्गखोल्यामध्येही धुळ साचली
जितेंद्र दखने
अमरावती: कोरोनाचे संकट असल्यामुळे मुलांना शाळेत न बोलता ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मागील दोन वर्षापासून शाळा प्रत्यक्षरीत्या बंद आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्या पासून मुलांचे भविष्य घडणाऱ्या शाळा आता साप विंचवाचे माहेरघर बनले आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५८३ शाळा आहेत. त्या सर्व शाळेतून एकूण जवळपास २ लाखांवर विद्यार्थी आहेत. परंतु सध्या कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. यामुळे मागील दोन वर्षात मुलांना शाळेत न बोलावता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शाळेत मुलांची येणे बंद आहेत.परिणामी शाळांची योग्य ती स्वच्छता होताना दिसत नाही. काही शाळेच्या आवारात कचरा साठला आहे तर काही शाळेच्या आवारात गवत,झुडपे वाढली आहेत. दरवाजे खिडक्या खराब होत आहे. त्यामुळे शाळेत साप, विंचवाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रत्येक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे सूचनेनुसार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शाळावर्ग खोल्यांची स्वच्छता,परिसर स्वच्छता केली जात आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी का होईना शाळा मात्र टापटीप ठेवण्यात येत आहेत.
बॉक्स
वर्ग खोल्यामधील धूळ हटेना
शाळेचा दरवाजा व खिडक्या खराब होत आहेत. त्याचबरोबर शाळा बंद असल्यामुळे वेळेवर स्वच्छता होत नाही. यामुळे वर्ग खोल्यांमध्ये धुळ साचल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
दुरवस्थकडे दुर्लक्ष
सध्या शिक्षकांना दररोज शाळेत येणे बंधनकारक केले आहे.अनेक शाळेत हजेरी लावून निघून जातात.त्यामुळे त्यांचे शाळा आवारात व शाळा खोल्यांच्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे.