शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अस्वलाची दहशत, ग्रामस्थांची रात्रभर गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:07 PM

नजीकच्या धामणगाव गढी येथे शेतात ओलितासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अस्वल दिसले.

ठळक मुद्देधामणगाव गढी येथील घटना : वनविभागाचे नागरिकांना आवाहन

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : नजीकच्या धामणगाव गढी येथे शेतात ओलितासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अस्वल दिसले. त्याने थबकून तिच्यावर पाळत ठेवली. अस्वल आंब्याच्या झाडावर चढताच गावकऱ्यांना माहिती दिली आणि अख्खी रात्र वनकर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी दहशतीत घालविली.धामणगाव गढी येथील शेतकरी गजानन झामरे हे देवगाव रस्त्यावरील शेतात चंद्रभागा कालवा परिसरातून शनिवारी रात्री १० वाजता जात होते. एक धिप्पाड अस्वल त्यांच्या दृष्टीस पडले. झामरे यांनी गावकऱ्यांना कळविले. अस्वल पाहण्यासाठी कुणी शेकोटी पेटविली, काहींनी बॅटरी घेऊन अस्वल शोधू लागले. काहींनी वनविभागाला माहिती दिली. नागरिकांनी रात्र अस्वलीच्या दहशतीत काढली.शेतकरी दहशतीखालीधामणगाव, गढी, देवगाव, वडगाव, एकलासपूर, धोतरखेडा तर अंजनगाव नजिकच्या शहापूर, दहीगाव, गरजदरी परिसरात अस्वलाने गत महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. गत पंधरवाड्यात दोघांना गंभीर जखमी केल्याने रात्री ओलितासाठी जाणाºया शेतकºयांमध्ये दहशत पसरली आहे. शेतात जाताना सावधगिरी बाळगावे, असे आवाहन परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी शेतकºयांना केले.पहाटे ४ वाजता उतरले अस्वलशनिवारी रात्री झाडावर चढलेले अस्वल रविवारी पहाटे चार वाजता उतरले आणि त्याने नजीकच्या चिखलदरा परिसरातील जंगलाकडे धूम ठोकली. रात्रभर वनपाल झामरे, पाथ्रीकर, वनमजूर आदींनी रात्रभर अस्वलाचा पहारा केला.धामणगाव गढी व दहीगाव परिसरातील नागरिकांनी अस्वलपासून सावध राहावे, रात्री शेतात एकटे जाण्याचे टाळावे.- शंकर बारखडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा