संभाजी ब्रिगेड आक्रमक : शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सध्या आर्थिक स्थिती विदारक असतानाही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोशिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी संभाजी बिग्रेडने आंदोलनात उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी संभाजी बिग्रेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाचा अभिषेक करीत संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. आंदोलनात संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, शरद काळे, रणजित तिडके, आदित्य देशमुख, स्वप्निल जाधव, परीक्षित राऊत, समीर नांदूरकर, रिद्धेश ठाकरे, गजानन देशमुख आदी उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी दुग्धाभिषेक
By admin | Published: June 03, 2017 12:07 AM