शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

महापालिकेनेच संबोधले डेंग्यू रुग्णांना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:14 PM

डेंग्यूबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत डेंग्यूसंशयित व डेंग्यूबाधित निश्चित करण्यासाठी इलिसा एनएस १ ही तपासणी सांगितली आहे. तथापि, सेंटिनल प्रयोगशाळेतील अहवालानेच डेंग्यूबाधित संबोधण्यात यावे, असा उल्लेखही नाही. मात्र, अहवालाबाबत महापालिकेचा अट्टहास आकलनापलीकडचा आहे आणि उपाययोजनांबाबत प्रशासन मूग गिळून बसले आहे.

ठळक मुद्देमार्गदर्शन मागविले : डॉ. मनोज निचत यांचे महासंचालकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यूबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत डेंग्यूसंशयित व डेंग्यूबाधित निश्चित करण्यासाठी इलिसा एनएस १ ही तपासणी सांगितली आहे. तथापि, सेंटिनल प्रयोगशाळेतील अहवालानेच डेंग्यूबाधित संबोधण्यात यावे, असा उल्लेखही नाही. मात्र, अहवालाबाबत महापालिकेचा अट्टहास आकलनापलीकडचा आहे आणि उपाययोजनांबाबत प्रशासन मूग गिळून बसले आहे. त्यामुळे डेंग्यूसंशयित व बाधित यांची व्याख्या काय, यासंदर्भात डॉ. मनोज निचत यांनी आरोग्य विभागाच्या महासंचालकांकडूनच मार्गदर्शन मागविले आहे.शासकीय व खासगी रुग्णालयांत डेंग्यूबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात दरवर्षीच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब महापालिका प्रशासनाला ज्ञात असतानाही उपाययोजनांवर फुली लागली आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची डेंग्यू इलीसा एनएस १ ही तपासणी करतात. त्यामधून रुग्णाला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यांना डेंग्यूबाधित म्हणू नका, असा पवित्राच महापालिकेचा आहे. ही बाब खासगी डॉक्टरांवर निर्बंध लादणारीच आहे. याउलट महापालिका प्रशासनाने एप्रिल ते जुलैपर्यंत पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांचे अहवालच मिळाले नाहीत. मग इतक्या कालावधीत खासगी डॉक्टरांनी डेंग्यूरुग्णांवर उपचार करायचे की नाही, तीन महिन्यांपासून अप्राप्त अहवालाची चूक प्रयोगशाळेची आहे की महापालिकेची आहे, याबाबत महापालिकेने कितपत पाठपुरावा केला, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सन २०१७ मध्ये ११ पॉझिटिव्हशहरात दरवर्षीच डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेता, उपाययोजना करणे व रक्तजल नमुन्यांचा अहवाल तात्काळ मिळविण्यासाठी प्रयत्न अपेक्षित होते.सन २०१७ मध्ये महापालिका क्षेत्रातून एकूण ३९८ डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. ११ नमुने पॉझिटिव्ह निघाले. सन २०१६ मध्ये ३६ नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले. सन २०१५ मध्ये २३ पैकी १ रक्तजल नमुना दूषित अर्थात पॉझिटिव्ह आढळला होता. सन २०१४ मध्ये एकूण १९९ पैकी ५० रक्तजल नमूने दूषित आढळून आले होते. अर्थात त्या ५० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. इर्विनमध्ये १ जानेवारी ते जुलैपर्यंत १० रुग्ण डेंग्यूबाधित आढळले.यांच्या रुग्णालयातून घेतले रक्त जल नमुनेडॉ. मनोज निचत, डॉ. अजय डफळे, डॉ. समीर चौधरी, डॉ. अमोल अवघड, होप हॉस्पिटल, दयासागर हॉस्पिटल, डॉ. सचिन काळे, डॉ. राजेंद्र ढोरे, डॉ.अद्वैत महल्ले, गेटलाइफ हॉस्पिटल, डॉ. विजय बख्तार, डॉ. नीलेश पाचबुद्धे, रेडिएंट हॉस्पिटल, डॉ. प्रवीण राठी, डॉ. एन.टी. चांडक, डॉ . रोहित चोरडिया, डॉ. बोंडे हॉस्पिटल, डॉ. राजेश मिसर, लाइफ केअर हॉस्पिटल, डॉ. श्रीगोपाल राठी, डॉ. पंकज बागडे, डॉ. पंकज बारब्देया परिसरात आढळले डेंग्यूसंशयितगणेशनगर, महालक्षमीनगर, ज्योती कॉलनी, नवीवस्ती बडनेरा, चक्रधरनगर, नवाथे परिसर, रविनगर, महावीरनगर, जानकीदेवी विहार, जयप्रभा कॉलनी, राठीनगर, सरोज कॉलनी, अंबा कॉलनी, एकनाथपुरम्, गाडगेनगर, सबनिस प्लॉट, चैतन्य कॉलनी, दस्तुरनगर, धनराजनगर, पार्वतीनगर, पुंडलिकबाबा कॉलनी, दत्त कॉलनी, देशपांडे लेआउट, न्यू प्रभात कॉलनी, देवरणकरनगर, जेवडनगर, पुंडलिकबाबानगर, टेलिकॉम कॉलनी, टीटीनगर, पार्वतीनगर, अंबा विहार, न्यू गणेश कॉलनी, सरस्वतीनगर, टेलिकॉम कॉलनी, अयोध्या विहार, उषा कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, छांगाणीनगर, प्रेरणा कॉलनी, जयंत कॉलनी, मधुबन कॉलनी, कुंभारवाडा, रुक्मिणीनगर, छाया कॉलनी, गोपालनगर, सदिच्छा कॉलनी, वैशाली कॉलनी, सागरनगर, उत्तमनगर, अमर कॉलनी, कॅम्प रोड, सुशीलनगर, सरोज कॉलनी, श्रीविकास कॉलनी, राधानगर, गांधीनगर, दीपानगर, महादेवनगर, मोतीनगर, कंवरनगर, शिव कॉलनील आणि खासगी रुग्णालयांत उपचार घेणाºया १६० लोकांना डेंग्यूसंशयित म्हणून ट्रीट करण्यात आले.महापालिका... तहान लागली की विहिरी खोदणारीडेंग्यूचा डास ४०० ते ५०० मीटरपर्यंत हवेत उडत जातो. डासांच्या अंडीवर प्रखर उन्हाचा प्रभाव होत नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होताच त्या अंड्यातून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी अनेक परिसरात रुग्ण आढळून येत आहेत. याविषयी सर्व माहिती महापालिकेला असतानाही दरवर्षीच उपाययोजनांची बोंब असते. पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने स्वच्छता,जनजागृती, नागरिकांना डेंग्यूविषयी सतर्क करणे, उपाययोजना करणे आवश्यक होते.२३ जुलैपर्यंत १६० रक्तजल नमुने१ ते २३ जुलै दरम्यान महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांत दाखल १६० डेंग्यूसंशयितांचे रक्तजल नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने संकलित केले. ते जिल्हा हिवताप अधिकाऱ्यामार्फत यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापूर्वी जून महिन्यात १४ व मे महिन्यात दोन रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे.