शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

डेंग्यूच्या साथरोगाने दिलालपूरवासी भयभीत

By admin | Published: May 27, 2014 11:23 PM

तालुक्यातील दिलालपूर येथे येथे गेल्या एका आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. साथीमुळे गावातील अनेक नागरिकांना लागण झाल्याने ब्राह्मणवाडा

चांदूरबाजार : तालुक्यातील दिलालपूर येथे येथे गेल्या एका आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. साथीमुळे गावातील अनेक नागरिकांना लागण झाल्याने ब्राह्मणवाडा (थडी) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी दिलालपुरात डेरेदाखल आहेत.

चांदूरबाजारपासून तीन कि.मी. अंतरावर असणार्‍या दिलालपुरची लोकसंख्या ४२५ असून जवळपास ५५ घरांची संख्या असलेल्या या टुमदार गावाला वृक्षवेलीने वेढले आहे. चारही बाजूने शेतजमीन असून या गावाला बोअरने पाणीपुरवठा होतो. या गावातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्या तुंबल्या आहेत. गावाच्या चारही बाजूंने पूर्णा प्रकल्पाचे कालवे असून गावाजवळील नालीमध्ये कालव्यातील ओव्हर फ्लोचे पाणी नेहमी भरले असते. यामुळे अशा पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव नेहमी होत असतो.

गावात आलेल्या या साथीमुळे प्रशासन खळबळून जागे झाले असून पदाधिकारी व अधिकारी यांनी आपला मोर्चा या गावाकडे वळविला. जि.प. चे आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी सर्वात अगोदर गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. चांदूरबाजारचे गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे आदी अधिकार्‍यांनी गावात येऊन साथीच्या रोगाची रितसर चौकशी केली. या गावातील अमरावती येथे होप दवाखान्यात भरती असणारे रोहिणी अर्डक यांच्या रिपोर्टवर डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे डॉक्टरांनी लिहिले आहे. तर गावातील रोशन बंडू तायवाडे, पवन राजेंद्र डोंगरे, रोहिणी बापुराव अर्डक, भाकरे, वेणूबाई दाभाडे, अमित बाबुराव भाकरे, दत्ता दिगांबर भाकरे, अलका बंडू तायवाडे व सुरेखा डोंगरे हे सुद्धा वेगवेगळय़ा दवाखान्यामध्ये तापाने भरती होते. ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाचघरे यांच्या नेतृत्वातील चमू आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी गावात सध्या तळ ठोकून आहे. गावात साफसफाईची मोहीम सुरू झाली असून सरपंच स्वाती भाकरे व ग्रामसेवक हे जातीने साफसफाईकडे लक्ष ठेवून आहे. तर पदाधिकार्‍यांनी नाली बांधकाम करण्याचे आश्‍वासन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)