*दंगा नियंत्रक पथकाची रंगीत तालीम तर शांतता बैठकी पार पडल्या.*
फोटो - दत्तापूर १७ ओ
धामणगाव रेल्वे : मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने दत्तापूर पोलिसांकडून शहरात शनिवारी पथसंचलन काढण्यात आले. दरम्यानच्या काळात ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी शांतता समितीच्या बैठकी घेऊन ईद सण शांतता राखून साजरा करण्याचे आवाहन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव मार्गदर्शनातून दत्तापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी शहरातील मुख्य रस्त्यांवर पथसंचलन करून मार्केट चौक, अमर शहीद, भगतसिंग चौक, महात्मा गांधी चौक, सिनेमा चौक, शास्त्री चौक परिसरातून मार्गक्रमण केले. गर्दीच्या ठिकाणांवरून दंगा नियंत्रक पथकाच्या रंगीत तालीम घेतल्या. मुस्लिमबहुल भागांमध्ये थांबून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे, द्वारका अंबोरे, पोलीस उपनिरीक्षक आगाशे यांच्यासह जमादार विजयसिंह बघेल, किरण दार्वेकर, पुरुषोत्तम चवरे, धनंजय झटाले, सचिन गायधने, सागर कदम, सुधीर बावणे, उमेश वाघमारे, संदीप वासनिक, प्रफुल वानखडे, सुबोध गिरणे व महिला कर्मचारी सरीता आंबडरे, कांचन दहाट, सारिका खडसे, नीलिमा बांधते व पोलीस दलासह शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले होते.