शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
2
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
3
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
4
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
6
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
7
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
8
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
9
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
10
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
11
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
12
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
13
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
14
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
15
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
16
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
17
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
18
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
19
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
20
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

शेतकरी अत्याचाराचा तो दिवस आजही स्मृतीत

By admin | Published: September 05, 2015 12:22 AM

शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी ...

धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी अत्याचारांच्या आठवणींना आजही उजाळा मिळत आहे़ दोन शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतरही त्यावेळी न्याय मिळाला नाही. अखेर शेतकरी आंदोलन शेवटच्या टप्प्यातही यशस्वी ठरले नसल्याची खंत आजही वृध्द शेतकरी व्यक्त करतात़धामणगाव तालुक्यात सन १९९७ मध्ये शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव होता़ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी संघटना ही व्याख्या पुढे येताच सर्वसामान्य शेतकरी कोणत्याही आंदोलनात सहभागी होत असे. उत्पादित शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी १२ ते १४ डिासेंबर १९९७ असे तीन दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन छेडून शासनाविरुद्ध संघर्ष केला़ पाहिल्या दिवशी बोरगाव धांदे, देवगाव, उसळगव्हाण, तळेगाव दशासर, राजना, चांदूररेल्वे तर दुसरीकडे अंजनसिंंगी, कुऱ्हा, जुना धामणगाव या रस्त्यावर चक्काजाम करण्यात आला़ परंतु प्रशासनाच्या बेधुंद कारभारामुळे बळीराजाचा आवाज मुंबईच्या राजदरबारापर्यंत पोहोचू शकला नाही़ दुसऱ्या दिवशी चक्काजाम आंदोलन तीव्र करण्यात आले़ नागपूर, औरंगाबाद या राज्य मार्गावरील भातकुली रेणुकापूर हे गाव आंदोलनासाठी निश्चित करून व्यूहरचना आखण्यात आली़तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भातकुली या गावात पोहोचले ़ दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली़ हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलबंड्या रस्तावर उभ्या केल्यात़ दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली़ परंतु शेतकऱ्यांनी अधिक आंदोलक पवित्रा घेतला़ मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर येथील पोलिसांनी लाठीमारास सुरूवात केली़ शेतकरी आंदोलनाला पोलीस प्रशासनानेच हिंसक वळण दिले़ हिरपूर येथील प्रमोद जवळकर व राजना येथील गणेश शिंदे हे दोन तरूण शेतकरी या आंदोलनात ठार झाले़ राज्य शासनापर्यंत हे वृत्त पोहोचले असले तरी दोन शेतकऱ्यांचा जीव या आंदोलनात गेला. आजही तालुक्यातील शेतकरी हिरपूर येथील प्रमोद जवळकर यांच्या मार्गावर जाऊन श्रध्दांजली वाहतात व आपल्या संवेदना व्यक्त करतात़