आॅनलाईन लोकमतअमरावती : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखों रुपयांनी गंडविणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (डेप्युटी डायरेक्टर आॅफ एज्युकेशन) कनिष्ठ लिपिकास फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अटक केली. गजानन नारायण हाते (५०,रा. महेंद्र कॉलनी) असे आरोपीचे नाव असून गेल्या दीड महिन्यापासून तो पसार होता.पोलीस सूत्रानुसार, १६ डिसेंबर २०१७ रोजी कैलास वामन दापूरकर (३२,रा.गाडगेनगर) याने फे्रजरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. त्यामध्ये आरोपी गजानन हातेने शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर नोकरी करीत असल्याचे सांगून लिपिक पदावर नोकरी लावून देण्याची बतावणी दापूरकर यांच्याकडे केली होती. यासाठी आरोपीने १ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. ते नोकरीवर रुजू होण्यास गेले असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. १६ डिसेंबर २०१७ रोजी गजानन हातेविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. फे्रजरपुरा पोलीस त्याचा शोध घेत होते. दापूरकर दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन सही करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे मंगळवारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लेवटकर व पोलीस शिपाई सायगन यांनी सापळा रचला. तो कार्यालयात स्वाक्षरी करून परत बाहेर येताच पोलिसांनी गजानन हातेला अटक केली. गजानन हाते याने लिपीक पदाची जाहिरात दिल्यानंतर बेरोजगारांना शिक्षण महासंचालकांच्या नावाचे बनावट नियुक्ती पत्र दिले. त्याने ३५ तरुणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.घराची झडती घेणारआरोपी गजानन हाते याने बनावट नियुक्तीपत्र कसे बनविले, त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याबाबत चौकशी करण्यासाठी हातेच्या घराची झडती पोलीस घेणार आहे.
डीडीई कार्यालयातील लिपिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:37 IST
नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखों रुपयांनी गंडविणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (डेप्युटी डायरेक्टर आॅफ एज्युकेशन) कनिष्ठ लिपिकास फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अटक केली.
डीडीई कार्यालयातील लिपिकाला अटक
ठळक मुद्देदीड महिन्यापासून होता पसार : नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंनी फसवणूक