अमरावती : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव २५ टक्के आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांना २६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
सध्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ व ६ मार्च रोजी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. लॉटरीचा अर्ज निवडलेल्या पालकांनी ९ ते २६ मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावयाची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यात १० मेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. यावर्षी आरटीई प्रवेशाची एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेच्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी राहील. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी संपल्यानंतरही शाळांत जागा रिक्त असतील व अर्ज शिल्लक राहिल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येणार आहे.
बॉक्स
संभाव्य वेळापत्रक
पालकांनी प्रवेश अर्ज भरणे २६ फेब्रुवारी
ऑनलाइन सोडत ५ ते ६ मार्च
प्रवेश निश्चिती ९ ते २६ मार्च
प्रतीक्षा यादी पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल
प्रतीक्षा यादी दुसरा टप्पा १२ ते १९ एप्रिल