विविध आजारांना आमंत्रण : नूडल्स, चायनीज पदार्थांमध्ये केला जातो वापरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चायनिजच्या हातगाड्यांवर विक्री होणारे खाद्यपदार्थ चविष्ट लागावे, यासाठी त्यात अजिनोमोटोचा वापर केला जातो. ते आरोग्याला हानीकारक असल्याने अनेक आजार डोके वर काढत आहे. शहरात तरूणाईमध्ये चटकमटक पदार्थांचे फॅड वाढले आहे. यामुळे शहरात ५० पेक्षा अधिक हातगाड्यांवर चायनिज पदार्थ विकले जात आहेत. विदेशातून भारतात आलेले व फास्ट फूडचे संचालक लहानांसह मोठ्यांच्याही जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मन्चुरींयम व चायनिज नुडल्समध्ये घातक अशा अजिनोमोटोचा (टेस्टिंग पावडरचा) सर्रास वापर करतात. पांढऱ्या रंगाचे चमकदार तांदळासारखे दिसणारे मोनोसोडिअम ग्लुटामेट यालाच अजिनोमोटो असे म्हणतात. हे एक पांढरे विष असून याचा वापर अन्न पदार्थात हॉटेल व चायनिजच्या गाड्यांवर याचा वापर केला जात आहे. त्यामुळे लहान मुलांसह तरुणार्इंमध्ये विविध प्रकारच्या घातक आजारांत वाढ होत आहे. पंचवटी चौक परिसरात अनेक महाविद्यालये असल्याने येथे आठ ते दहा चायनिजच्या हातगाड्या नियमित लावण्यात येतात. कमी वेळात चांगले फास्ट फूड मिळत असल्यामुळे रात्री येथे गर्दी तरुणांर्इंची व लहान मुलांची गर्दी असते. ५० रुपये प्लॅट नूडल्स, तर एवढ्याच पैशात या ठिकाणी चवदार मन्च्युरीअम हा चायनिज खाद्यपदार्थ मिळतो. अन्न पदार्थांची चव वाढविण्यासाठी अजिनोमोटोचा सर्रास वापर केला जातो. चायनिजच्या नूडल्स व मन्च्युरींअमची चांगली चव येण्यासाठी एका प्लॅट नूडल्समध्ये एक ते दोन चम्मच अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटोचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास यातून अनेक आजारला आमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यातून अने क प्रकारचे पोटाचे आजार होतात. आतड्यांचेसुध्दा आजार होतात. एक ते दोन वर्षे सतत अजिनोमोटोयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने कर्करोगालासुद्धा बळी पडावे लागू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पूर्वी विदेशात फास्ट फूड म्हणून व भूक वाढविण्यासाठी अजिनोमोटोचा वापर अन्न पदार्थात करण्यात येत होता. हळुहळू पदार्थ चविष्ट बनविण्याचा तो उपायच ठरू लागला आहे. मात्र त्याचे प्रमाण योग्य असावे लागते. वाढत्या स्पर्धेच्या युगात ग्राहक वाढविण्याच्या नादात हातगाडीचालक ग्राहकांना चवदार पदार्थ देण्याच्या नादात अजिनोमोटोचे प्रमाण वाढतात, तेच ग्राहकांना आजारी होण्यास कारणीभूत ठरते. अनेक नागरिकांना यामुळे आजार बळावू शकतो, याची साधी कल्पनाही नसते. यातूनच विविध आजारांची मालिका सुरू होते. "लोकमत"ने अनेकदा हा विषय लोकदरबारात मांडून नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरिता वारंवार वृत्त प्रकाशित करून नागरिकांना सावध केले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात नागरिकांची चायनिजच्या हातगाड्यांवर सायंकाळी गर्दी वाढलेली दिसते. यात तरुणांचा समावेश अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे चायनिजच्या खाद्यपदार्थामधून अनेक आजार मोफत मिळत असल्याचे सत्य उघड होत आहे. काय आहे अजिनोमोटो ? मोनोसोडिअम ग्लुटामेट (एमएसजी) याला अजिनोमोटो असेही म्हणतात. हे एक टेस्टिंग पावडर असून खाद्यपदार्थाला चव येण्यासाठी याचा सर्वाधिक वापर चायनिज पदार्थांमध्ये केला जातो. अलीकेडे स्वादिष्ट मटन, चिकन व अंडाकरीतही अजिनोमोटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यातून पोटाचे विकार व इतर अनेक आजार नागरिकांना होत आहे. हे पांढऱ्या रंगाचे चमकदार विष आहे. हे एक सोडीअम सॉल्ट आहे. विदेशात याचा मसाले म्हणूनही वापर केला जातो. अजिनोमोटोमुळे होणारे आजारसतत अजिनोमोटोचा खाद्यपदार्थात वापर केल्यास डोके दुखणे, घाम येणे, चक्क र येणे, चेहऱ्यावर सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, पोटाचे अनेक आजार व यामुळे पोटाचा आतड्यांचा कर्करोगही होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. अजिनोमोटोयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने प्रचंड भूक वाढते, लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे रक्तचाप, मधुमेह व पोटाचे विकाराला यातूनच आमंत्रण मिळते. अजिनोमोटोचा वापर हे एक स्लो पॉयजन आहे. त्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. - अतुल यादगिरे, कॅन्सर तज्ज्ञ, अमरावती
चायनिज खाद्यपदार्थांसोबत घातक अजिनोमोटो!
By admin | Published: May 08, 2017 12:09 AM