फोटो जे-११ रोड फोटो
विजय नाडे
माहुली चोर : अमरावती-यवतमाळ या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहत असून दोन वर्षांपासून दुरुस्तीअभावी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. माहुली चोर ते धानोरा गुरव दरम्यान या मार्गाची चाळण झाली आहे. खड्ड्यातून वाट काढणाऱ्या चालकांना रात्रीच नव्हे, तर दिवसाही अपघातास सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कशी येत नाही, असा सवाल त्रस्त वाहनधारक करीत आहेत.
दोन-अडीच वर्षांपासून हा रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने उसळत आहेत. त्यावर सार्वजनिक विभागाने ठिकठिकाणी मलमपट्टी केल्याने कुठे चढ, तर कुठे उतार निर्माण झाला आहे. दुचाकी, चारचाकी वाहने उसळून प्रवाशांच्या शरीराचे एक-एक अवयव खिळखिळे होत असताना संबंधित विभाग रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का करीत असेल, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे.
बॉक्स
अपरिमित हानीची शक्यता
अमरावती - नांदगाव प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सुपर एक्स्प्रेस हायवे याच मार्गाला जोडल्याने मालवाहू ट्रकांसह कंटेनरदेखील या रस्त्यावरून धावतात. पेट्रोल, डिझेलचे टॅंकरसुद्धा धावतात. दरम्यान खड्ड्यांमुळे घर्षण होऊन अचानक आग लागून अपरिमित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कोट
अमरावती - यवतमाळ रस्त्यावरील खड्डे गतवर्षी बुजविण्यात आलेत. मात्र, वर्दळीमुळे रस्ता आणखी खराब झाला आहे. पूर्ण रस्ता नूतणीकरणाला मंजुरी प्राप्त झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर काम सुरू करण्यात येण्याची आहे.
- गणेश रंभाड,
उपअभियंता, सार्वजिनक बांधकाम उपविभाग, बडनेरा