रोष : मध्यवर्ती कारागृहातील घटनाअमरावती : हत्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा बुधवारी अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सुदेश बारकाजी आठवले (३४, रा. महाजनपुरा) असे, मृताचे नाव आहे. सुदेशचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त होत होता. मृत सुदेश आठवले याने अंबागेट परिसरातील गुल्हाने नामक युवकाची हत्या केली होती. त्यामुळे त्याला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुट्टी घेऊन घरी परत गेला होता. शनिवारी पॅरोलवरील रजा संपल्यामुळे सुदेश पुन्हा कारागृहात गेला होता. मात्र मध्यरात्री अचानक सुदेशची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र इर्विनमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुदेशच्या मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांनी इर्विनच्या शवविच्छेदन गृहासमोर गर्दी केली होती. सुदेश कारागृहात गेल्यावर त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, त्याला अचानक काय झाले, असे प्रश्न नातेवाईकांनी पोलिसांसमोर उपस्थित केला. त्यामुळे काही वेळ शवविच्छेदनगृहासमोर नातेवाईकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तहसीलदार रमेश इंगोले व फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी सुदेश याच्या मृतादेहाचा पंचनामा इन कॅमेरा केला आहे. (प्रतिनिधी)
आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीचा मृत्यू
By admin | Published: April 09, 2015 12:20 AM