लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेड्यूल-३ मधील वन्यप्राणी तडशाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी मार्डी ते शेंदोळा मार्गावर घडली. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर तडसाचा मृतदेह जंगलात जाळला.शनिवारी सकाळी तडशाचा मृतदेह रोडलगत आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती एका शेतकऱ्याने वनविभागाला दिली. सहायक वनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, मानव वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, वनरक्षक कांबडी, फोटे, वनपाल संतोष धापड यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, चारचाकीच्या धडकेत तडशाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद घेऊन वनविभागाने पुढील कारवाई सुरू केली होती.रस्त्यावरील वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्याने वन्यप्रेमी हळहळले आहेत. या वाढत्या अपघातांमुळे वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. यासंबंधी ठोस उपाययोजना वनविभागाने करणे आता गरजेचे झाले आहे.तडस जंगल स्वच्छकर्तातडसाला जंगलातील स्वच्छकर्ता म्हणून गणले जाते. वन्यप्राण्यांनी एखादी शिकार खाल्ल्यानंतर उरलेले मांस व हाडाचा सापळा तडसाचे खाद्य बनते. ते संपूर्ण मांस व हांडे तडस फस्त करून जंगल स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. तडस हा शेड्युल ३ मधील वन्यप्राणी असून, त्याची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. हा वन्यप्राणी दुर्मिळ होण्याची भीती आता वन्यप्रेमींपुढे आहे.
वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेड्यूल-३ मधील वन्यप्राणी तडशाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी मार्डी ...
ठळक मुद्देमार्डी ते शेंदोळा मार्गातील घटना : वनविभागाला पाचारण