जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भारतीय महिला फेडरेशनची मागणीअमरावती : शेतकरी परिवारातील अनेक महिलांनी बचत गट, राष्ट्रीय सहकारी बँक, खासगी मायक्रो फायनान्स (बेसिक) चे कर्ज घेतली आहे. मात्र शेती व्यवसाय तोट्यात असल्याने कर्ज थकीत आहेत, हे कर्ज माफ करण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा कौन्सिलद्वारा निवासी उपजिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.महाराष्ट्र शासनाने खासगी मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, कर्जवसुलीसाठी महिलांवर जीवघेणे दडपण आणणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीवर व त्यांच्या प्रतिनिधीवर कारवाई करण्यात यावी व मायक्रो फायनान्सच्या व्यवहाराची शासन व त्यांच्या प्रतिनिधीवर फौजदारी खटले दाखल करावे व मायक्रो फायनान्स कंपनीद्वारा व्याजाने दिलेल्या पैशाची व महिलांनी व्याजासह भरलेल्या पैशाची कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत नोंद नसल्याने तो पैसा काळा पैसा म्हणून घोषित करावा, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष क्रांती देशमुख, सचिव सोनाली नवले, छाया खंडारे, संगीता जकाते, पुर्ती लोखंडे, कल्पना बंगरे, शकील बानो, ज्योती वानखडे, स्मिता मानवटकर व अशोक सोनारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मायक्रो फायनान्सपासून कर्जमुक्त करावे
By admin | Published: January 17, 2017 12:09 AM