शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
2
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
3
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
4
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
6
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
7
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
8
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
9
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
10
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
11
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
12
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
13
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
14
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
15
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
16
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
17
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
18
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
19
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
20
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:16 AM

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण ...

अमरावती : कोरोनामुक्त गावांमध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच शिक्षण विभागाने जारी केला. ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करायचे आहेत. संबंधित गावात किमान महिनाभर आदीपासून एकही कोरोना बाधित नसावा, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गावांनी कोरोना निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यात कुणीही कुचराई करू नये, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.

बॉक्स

समितीत यांचा समावेश

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच, सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच निमंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी सदस्य, सचिव, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल.

बॉक्स

नव्याने घेतलेला निर्णय

दोन दिवसापूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणेबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून बुधवारी पुन्हा नव्याने आठवी व बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

बॉक्स

‘चला मुलांनो शाळेत चला‘ मोहीम

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले जावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे तसेच चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.