शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:07 PM

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : यशोमती ठाकू र, वीरेंद्र जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीन झाडांनी माना टाकल्या आहेत. कमी पावसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. परंतु, मृग नक्षत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर तग धरून असलेले सोयाबीन आता पिवळे पडूृन सुकत चालले आहे. पिकांची स्थिती पाहून शेतकरी हवालदील होत आहेत. शेंगा भरल्या नसल्याने हे नगदी पीक शेतकºयांच्या हातून निसटले आहे. तिवसा तालुक्यातील २२ हजार १५३ हेक्टरवरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांनी केली. सोमवारी आठवड्याचा प्रारंभ असल्याने कुठल्याही बैठकीला झेडपी अधिकाºयांना बोलविण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आमदारद्वयांंनी केली. यावेळी झडेपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, रमेश काळे, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, नरेंद्र विघ्ने, वीरेंद्र जाधव, नौशाद पठाण, इम्रान खान, दिलीप काळबांडे, अभिजित मानकर, विष्णू राठोड, पिंटू गुडधे, ऐनुल्ला खान, पंकज देशमुख, नंदू खडसे, मुकद्दरखाँ पठाण, साहेबराव ठाकरे आदी उपस्थित होते.मृग, उडिदाची खरेदी सुरू करामूग व उडीद बाजार समितीत दाखल होण्यास दोन आठवडे झाले. दोन्ही शेतमालाची मोठी आवक आहे. मात्र, व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २५०० रुपये नुकसान होत आहे. पणनमंत्री मात्र हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आॅक्टोबरच्या मुहूर्तावर ठाम आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी आमदारद्वयांनी केली.सोयाबीन पडले पिवळेतिवसा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दमदार दिसणारे सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकºयांचे हातचे नगदी पीक गेले आहे. दोन वर्षांच्या दुष्काळाने होरपळल्यानंतर मागील वर्षी शेतमालाला मिळालेला मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी आमदारद्वयांंनी केली आहे.खोलापूरच्या मतदार यादीतून नावे गहाळभातकुली तालुक्यातील खोलापूर येथील जवळपास ७०० मतदारांची नावे यादीत नसल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्यावतीने केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज संस्थेची मतदार यादी व विधानसभा, लोकसभा निवडणुकीची मतदार यादी यात फरक आहे. सदर मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांकडून याची तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.जिल्हाभरात सोयाबीनचे पीक हातून गेले आहे. शेतकºयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करा. नुकसानभरपाई द्या. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. मूग व उडीदाची खरेदी केंद्र सुरू करा.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसाविविध शेतांमध्ये सोयाबीन पिकाची अचानक पाहणी केली. पाहणीत नुकसान स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठवून, सर्र्वेेक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारीसोयाबीनचे नुकसान प्रचंड आहे. मूग व उडिदाची शासकीय खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. ते त्वरित सुरू करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वे