शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

यंदा वृक्ष लागवडीत घसरण; वनविभागात कोटींमध्ये नव्हे तर हजारांत वृक्ष लागणार?

By गणेश वासनिक | Published: May 19, 2024 5:41 PM

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभाराचा फटका, वनविभागात आता ऐका... हो... ऐका...!

अमरावती : दरवर्षी कोटी वृक्ष लागवड करणाऱ्या वनविभागाची वाटचाल अधोगतीकडे सुरू झालेली असून एका अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या तुघलकी कारभारामुळे यंदा राज्यात केवळ हजारो वृक्ष लागणार कारण अभिसरण योजना आणल्यामुळे वनविभागावर आता ऐका... हो.. ऐका अशी म्हणण्याची वेळ आलेली दिसून येते. सन २०१८ पासून ते २१ पर्यंत राज्याच्या वनविभागात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. ही योजना कमालीची यशस्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून वनविभागाने केवळ हजारोंच्या आत वृक्ष लागवड केलेली दिसून येत आहे. 

राज्याच्या वनविभागात आयएफएस लॉबीमध्ये नसलेला समन्वय आणि अंतर्गत चढाओढ या कारणाने वृक्षलागवडीच्या कामामध्ये वनविभाग माघारलेला आहे. यंदा राज्यात वनविभाग केवळ हजारो या अंकात वृक्षलागवड करणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. कारण अभिसरण 'टॉप ऑफ' ही योजना विचारात न घेता वनाधिकाऱ्यांच्या माथ्यावर मारल्यामुळे रोपवन होण्यास कुणीही इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना गावा-गावांत द्यावी लागेल दवंडी, ऐका हो... ऐकाराज्याच्या वनविभागात वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुख ही पदे कार्यकारी पदे असताना सध्या मात्र एका ‘के.के.’ नामक प्रधान मुख्य वनसंरक्षकांची दहशत वनविभागात आयएफएस लॉबी ते खाली वनकर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. सध्या केके जोमात असून आचारसंहितेमध्ये सुद्धा त्यांची गाडी सुसाट दिसून आली. 

दरदिवशी नवनवीन आदेश काढत असल्याने वनविभाग सध्या कमालीचा स्तब्ध झाला आहे. वनविभागात अजूनही पूर्व पावसाळी कामे न झाल्यामुळे वनविभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. अभिसरण योजनेत जॉबधारक मजूर उपलब्ध होण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावा-गावांत दवंडी पिटवून ऐका हो ऐका म्हणतं. कामावर येण्याचे आवाहन करावे, असा अजब फतवा काढलेला आहे. दवंडीत आदेशात मजुरी दर याचा उल्लेख होणे गरजेचे आहे असेही नमूद आहे. वनाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष‘के.के’ यांनी अभिसरण योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांवर काम करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने शासनास अहवाल सादर केल्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी समितीच्या अहवालास केराची टोपली दाखवित अभिसरण योजना राबविण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांना प्रमुख केलेले दिसून येत आहे. कल्याणकुमार सचिवांच्या मर्जीतील असल्याने राज्यातील आयएफएस कमालीचे दहशतीमध्ये काम करीत आहेत. कारण त्यांच्या मार्फत कनिष्ठ वनाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याची भावना वनविभागात निर्माण झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती