शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

आरएमसी प्लांटची परवानगी नाकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:10 PM

शहरातून जाणारा पांढुर्णा-मोर्शी या राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देकारवाई : प्रदूषण मंडळाचे तहसीलदारांना पत्र

आॅनलाईन लोकमतवरूड : शहरातून जाणारा पांढुर्णा-मोर्शी या राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वरूड शहरात आरएमसी प्लांट उभारला आहे. या प्लांटला प्रदूषण नियंत्रण मंडळाने भेट देऊन परवानगी नाकरली. यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर यांनी तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले आहे.अमरावती रस्त्यावर मिक्स प्लांट टाकताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली नसल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी आरएमसी प्लांटला भेट दिली. त्यानंतर तो अहवाल तहसीलदारांना पाठविला. या अहवालानुसार वरूड येथे अमरावती मार्गावर एचजी इन्फ्रास्टक्चर कंपनीने आरएसी प्लांट सुरू केला आहे. तथापी जल (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा १९७४ नुसार संमत्तीपत्र घेणे बंधनकारक असूनही कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी किंवा संमतीपत्र घेतले नाही.श्वसनाचे आजार वाढलेकोणतीही परवानगी न घेता हा प्लांट सुरू केला. या प्लांटवर तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर करावाई करीत परवानगी नाकारावी, अशा सूचना केली आहे. नागपूर महामार्ग ते पांढुर्णापर्यंतच्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. यासाठी खोदकाम सुरू आहे. रस्त्यावर दगड माती व धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे श्वसणाचे आजार वाढले आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सचिन अंजीकर यांनी तक्रार केली होती.

एचजीच्या व्यवस्थापकांना पत्रतहसीलदारांना प्रदूषण मंडळाने दिलेल्या पत्राची एक प्रत एचजी इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या प्लँट व्यवस्थापकांना दिले आहे. यात जल कायदा १९७४ ब हवा कायदा १९८१ अन्वये संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. पत्र प्राप्त होताच सात दिवसात आॅनलाइन अप्लिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहेत.