शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

सिंंचन प्रकल्पांच्या पातळीत घट

By admin | Published: January 11, 2015 10:44 PM

अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे.

संजय खासबागे - वरुडअत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे. जलाशयांमध्ये पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे सुतोवाच सिंचन विभागाने केले आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयन क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मिटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे. वघाळ बंधारा असून याची ओलीत क्षमता ४९६ हेक्टरची आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पांची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टर असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानातसुध्दा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन जानेवारीमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एरवी जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते. या व्यतिरिक्त काही गावांनाही पिण्याकरिता पाणीपुरवठा होत आहे. पाकनाला प्रकल्पाला दरवाजा नसल्याने जलसंचय होऊ शकला नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांकरिता सिंचन व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले आहेत. पाणी पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यातील २३ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा तसेच संत्रा, कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता सिंचन विभागाचे अभियंता सोनारे यांनी व्यक्त केली आहे.