अमरावती : जिल्ह्यात फेब्रुबारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यानंतर ११५ दिवसांनी पॉझिटिव्हिटीत दिलासा मिळाला आहे. रविवारी जिल्ह्यात ६३७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असली तरी पॉझिटिव्हिटी ही फक्त ११ टक्के आहे. यात ५,७८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यानंतर संसर्गाचा ग्राफ माघारला. मात्र, त्यानंतर फेब्रुबारीच्या पहिल्याच आठवड्यापासून कोरोना ब्लास्ट सुरू झाला. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अमरावतीपासून सुरू झाली. दरम्यान, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यातील चर्चेनंतर जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आले. नंतर शासनादेशाने सुरू झालेली कठोर संचारबंदी अजूनही सुरूच आहे. दरम्यान मार्च, एप्रिल व आता मे महिन्यातही कोरोनाचा आलेख वाढताच आहे. २३ मे रोजी पॉझिटिव्हिटी ११ टक्के असली तरी रुग्णसंख्या ६३७ इतकी आहे. जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून कठोर संचारबंदी लागू असल्याने त्याचे परिणाम आता दिसायला लागतील व कोरोना संसर्गात कमी येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दोन टप्प्यात आलेली आहे. यात पहिल्या टप्प्यात अमरावती शहरात फेब्रुवारी, मार्च अखेरपावेतो व त्यानंतर एप्रिल महिन्यापासून ग्रामीणमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. तो आता काहीअंशी कमी व्हायला लागल्याने दिलासा मिळाला आहे.
पाईंटर
पाॅझिटिव्हिटीची जिल्हास्थिती
१ फेब्रुवारी : ५,१४ टक्के
१ मार्च : ३१.८८ टक्के
१ एप्रिल : १०.६२ टक्के
१ मे : २६.५३ टक्के
२३ मे : ११.०१ टक्के
बॉक्स
रविवारी ६३७ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात रविवारी ६३७ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८८,४८० वर पोहोचली आहे. याशिवाय उपचारानंतर बरे वाटल्याने उच्चांकी १,१४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या आता ७८,५४१ झालेली आहे. ही टक्केवारी ८८.७७ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
२४ तासांतील कोरोना मृत्यू
उपचारादरम्यान ३५ वर्षीय पुरुष, वरूड, ६५ वर्षीय पुरुष, गंगारखेडा, ६० वर्षीय महिला, सासन, ५५ वर्षीय पुरुष, साखरा, ६० वर्षीय पुरुष, मोर्शी, ४५ वर्षीय महिला, खिराळा, ४२ वर्षीय पुरुष, शिरजगाव, ३८ वर्षीय पुरुष, शे.बाजार, ६० वर्षीय, पुरुष, वडगाव, ५६ वर्षीय पुरुष, समदा, ७५ वर्षीय पुरुष, पूर्णा नगर, ६५ वर्षीय पुरुष, दाभा, ३६ वर्षीय पुरुष, कोदारी, ३५ वर्षीय पुरुष, दर्यापूर, ९० वर्षीय पुरुष, अचलपूर याशिवाय वाशिम जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.