वनोजा बाग(अमरावती) : अंजनगाव सुर्जी येथील काठपुऱ्यात विघ्नहर्ता युवा ग्रुपच्या रौप्य महोत्सवानिमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आमदार बळवंत वानखडे, डाॅ. राजेंद्र कोकाटे, माजी आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, सुधीर सूर्यवंशी, प्रेमकुमार बोके, नगरसेवक सचिन जायदे, अजय पसारी, रवींद्र बोडखे, इंदिरा गावंडे, अर्चना पखान यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्ष सचिन गावंडे यांनी आभार मानले.
--------------
जावयाचा मेहुणीवर अत्याचार
वरूड : तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणीवर वर्धा जिल्ह्यातील जावयाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्याची आर्वी पोलीस ठाण्यात नोंद घेतल्यानंतर वरूड पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
१० महिन्यांच्या कालावधीत हा घडला. पीडितेवर तिच्या मोठ्या बहिणीचा पती लीलाधर नांदणे (३९, रा. रोहणखेडा) याने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला. तिने बदनामीच्या भीतीने आतापर्यंत ही बाब उघड केली नव्हती. मात्र, प्रकरण वाढत असल्याने युवतीने तक्रार देण्यास पुढे आल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
------------
बडनेरात परिसरात घरफोडी
बडनेरा : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिक्रमा अपार्टमेंटमध्ये प्रफुल्ल सुधाकर वासनकर यांचे घर फोडून अज्ञातांनी १०० ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. ते मूर्तिजापूर येथे गेले होते. याच अपार्टमेंटमधील आनंद खंडेलवाल यांच्या घराचा कडी कोंडादेखील तोडलेला होता. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.