अमरावती : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद राज्य शासनात अपर प्रधान सचिव दर्जाचे आहे. नोकरशाहीत आयपीएस, आयएएस याचप्रमाणे आयएफएस लॉबी सक्रिय आहे. तथापि, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीचे निलंबन व अटकेच्या कारवाईने आयएफएस लॉबी हादरून गेली आहे.
सोशल मीडियावर रेड्डीच्या अटकेबाबत दोन मतप्रवाह आहेत. रेड्डीला आरोपी म्हणून दिलेली वागणूक बघून आयएफएस लॉबीला तर शॉकच बसला आहे. रेड्डीच्या दिमतीला तीन शासकीय वाहने, बंगला, नियमित ‘यस सर’ म्हणणारे अधिकारी, कर्मचारी हा बडेजाव दीपाली आत्महत्या प्रकरणातील त्याच्या सहभागाने संपुष्टात आला. त्यामुळे आयएफएस अधिकारी सावध झाल्याचे चित्र आहे.महिला आयोगासमोर पेशी होण्याचीही संधी नाही
दीपाली आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने रेड्डी याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रेड्डी याने नोटीसला उत्तर देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत वेळ मागितला होता. तथापि, २९ एप्रिल रोजी धारणी पोलिसांनी रेड्डीला अटक केल्यामुळे महिला आयोगापुढे जबाब दाखल करण्याची डेडलाईन ‘जैसे थे’च राहिली.