शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सदोष वेतननिश्चितीने लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:30 PM

महापालिका आस्थापनेवरील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती चुकीची झाल्याने प्रशासनाला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक निरीक्षण स्थानिक निधी लेखा संचालनालयाच्या लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे.

ठळक मुद्देवेतनवाढीवरही आक्षेप : लेखापरीक्षकांनी ओढले ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आस्थापनेवरील अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती चुकीची झाल्याने प्रशासनाला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक निरीक्षण स्थानिक निधी लेखा संचालनालयाच्या लेखापरीक्षकांनी नोंदविले आहे. अतिरिक्त वेतन, वेतनवृद्धी यावरही आक्षेप नोंदविले असून, फरकाची ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.औरंगाबाद स्थित स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे त्रिसदस्यीय पथकाकडून महापालिकेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू आहे. लेखापरीक्षकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका तपासल्या. अनेकांची वेतननिश्चिती चुकीच्या पद्धतीने केली असल्याने संबंधितांना अतिरिक्त, वाढीव वेतन देण्यात आले. यात तूर्तास मोठ्या पदांचा प्रभार सांभाळणारे अधिकारीही समाविष्ट आहेत. वेतनातील वाढ लक्षात आल्यानंतरही संबंधितांनी सामान्य प्रशासन विभाग वा लेखा विभागाकडे तक्रार केली नाही, असा आक्षेपही लेखापरीक्षकांनी नोंदविला तसेच अतिरिक्त वेतन, आगाऊ वेतनवृद्धी व वेतनातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. सेवापुस्तिकांची तपासणी पूर्ण व्हायची असल्याने किती जणांची वेतननिश्चिती चुकीची व अतिरिक्त वेतनाची रक्कम स्पष्ट होऊ शकलेली नाही.रकमेचे संबंधितांकडून समायोजन करण्यात यावे, असा लेखाआक्षेप लेखापरीक्षकांनी घेतला आहे. लेखापरीक्षकांनी सामान्य प्रशासन विभागाला समायोजनाचे आदेश दिल्याने अधीक्षक दुर्गदास मिसाळ यांच्या नेतृत्वातील एक चमू त्यासाठी काम करीत आहे. २०११ पासून प्रत्येक वर्षी सेवापुस्तिकांमधील त्रुटींंवर आक्षेप घेतले जात असताना, २०१८ पर्यंतही त्या त्रुटींची सुधारणा होऊ नये, ही महापालिकेची प्रशासकीय लेटलतिफीवरही कोरडे ओढले गेले आहेत.चुकांचा भडिमारआगाऊ वेतनवाढ देय नसताना झालेले अतिप्रदान, चुकीची वेतननिश्चिती, मूळ वेतनापेक्षा कमी वा जादा वेतन अदायगी, वेतनश्रेणीतील तफावत, ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देणे यावरही औरंगाबादच्या आॅडिटरने आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप २०१३-१४ चा आर्थिक वर्षातील असल्याची माहिती जीएडीने दिली.औरंगाबाद स्थित स्थानिक निधी लेखासंचालनालयाच्या लेखापरीक्षकांकडून सेवा पुस्तिकांचे निरीक्षण सुरू आहे. त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सेवापुस्तिकांचे अपडेशन सुरू करण्यात आले आहे.- महेश देशमुखउपायुक्त, प्रशासन