राजुरा बाजार : स्थानिक वॉर्ड क्र. ५ मधून गेलेल्या वीजवाहक तारा हटविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. महावितरण कंपनी अंतर्गत हातुर्णा-राजुरा मेन लाईनवरील ११ केव्हीच्या वीजपुरवठ्याची तार राजुरा येथील मध्य वस्तीतून गेली आहे. तेथून हातुर्णा येथे वीजपुरवठा होतो. त्यामुळे खुल्या प्लॉटवर बांधकामही करता येत नाही. अपघात होण्याची शक्यता असते. यापूर्वी याच लाईनमुळे अपघात होऊन सन २०१८ मध्ये एका मजुराचा जीव गमवावा लागला होता. हातुर्णावरून येणारी गावठाण फीडरची लाईन गावाबाहेरच्या जागेतून न्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. महावितरणच्या स्थानिक कार्यालयात याअगोदर बरेचदा अर्जांद्वारे मागणी केली आहे. निव्वळ टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बहुरूपी यांनी केला आहे.
‘ती विद्युत तार हटवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:14 AM