शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

साडेसहा कोटींच्या विकासकामांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 12:37 AM

जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर सुमारे ६.५० कोटींच्या कामांची प्रशासकीय कारवाई

जिल्हा परिषद : निधीतील कामे मार्गी लागण्याची आशा धुसर अमरावती: जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर सुमारे ६.५० कोटींच्या कामांची प्रशासकीय कारवाई शून्य असल्याने ऐन निवडणुकीच्या कालावधीतच याकामांचा बोजवारा उडण्याची चर्चा झेडपीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामविकासाला बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हानिधीतून विकासकामांचे नियोजन केले आहे. यानुसार ६.५० कोटींच्या निधीतून विविध कामे मंजूर केली आहेत. मात्र, याकामांचा प्रस्ताव ६ जूनच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम, पंचायत आणि वित्त या तीन विभागांपैकी नेमका कोणी मांडला, असा प्रश्न सभेत बसपाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला होता. याप्रश्नावर उपरोक्त तीन्ही विभागांनी मौन धरले होते. त्यामुळे हा ठराव आलाच कसा, याचे उत्तर सभागृहात सदस्यांना देण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे सभेत ठराव मांडला कुणी, हे माहित नसताना नेमका ठरावा पारित झाला तरी कसा, हे कोडे सुटले नाही. तरी देखील २५-१५ या लेखाशिर्षामध्ये (लोकपयोगी कामे) ६.५० कोटींची २०८ विविध कामे मंजूर करून प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. मात्र, प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित होताच जिल्हानिधीचे नियोजन कोलमडले असून प्रशासकीय मान्यता दिली असली तरी याची जबाबदारी घेण्यावरून प्रशासकीय यंत्रणेने हात वर केले आहेत. त्यामुळे कोटयवधी रूपयांच्या कामांचा प्रस्ताव सध्या प्रशासकीयस्तरावर बारगळा आहे. या प्रस्तावानुसार कामांच्या निविदा मागविणे, निविदा उघडणे, कार्यारंभ आदेश असे प्रशासकीय सोपस्कार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया करावी लागते. दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असून त्यासाटी डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडयात आचारसंहिता लागू होऊ शकते. प्रशासकीय सोपस्कार आणि आचारसंहिता या दोन्ही बाजू लक्षात घेतल्यास सुमारे ६.५० कोटी रूपयांमधून लोकोपयोगी २५-१५ या लेखाशिर्षातील कामे एक ते दीड महिन्याच्या कालावधीत करणे अशक्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हानिधीतील विकासकामांचा बोजवारा उडण्याची शक्यता वाढली आहे. आता जिल्हा परिषदेचे सत्ताधारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आचारसंहितेपूर्वी विकासकामे मार्गी लागावीत, या अनुषंगाने निर्णय होतो किंवा कसे, याबाबत प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)