अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत राहण्याची शक्यता असलेला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’मुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. या विषाणूचा शिरकाव जिल्ह्यात होऊच नये, याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे सावधगिरीचे उपाय अवलंबले जात आहेत. दरमहा १२५ नमुने दिल्ली येथील संस्थेकडे व दर १५ दिवसांनी १५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’कडे जात आहेत. मात्र, याचे अहवाल जिल्ह्यास उपलब्ध होत नसल्याची माहिती विद्यापीठ लॅब समन्वयकांनी दिली.
‘डेल्टा प्लस विषाणू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून पुन्हा संचारबंदीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. वास्तविक, जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी एक टक्क्याच्या आत असल्यानेच एका आठवड्यापूर्वी जिल्हा अनलॉक करण्यात आला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे जे म्युटेशन सापडले होते, त्याला डब्लूएचओकडून ‘डेल्टा व्हेरिएंट’ नाव देण्यात आले होते. आता यामध्ये पुन्हा म्युटेशन होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झालेला आहे व दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडाली होती. यातून सावरत नाही तोच या नवा व्हेरिएंटने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या डेल्ट प्लस विषाणूचे तांत्रिक नाव बी.१.६१७.२.१ असे आहे. आतापर्यंतच्या म्युटेशनमध्ये आढळून आलेलीच लक्षणे या ‘प्लस’मध्ये आढळतात. मात्र, संसर्ग झाल्यावर झपाट्याने प्रकृती खालावते डोकेदुखी, घशाला सूज, नाक गळणे, याशिवाय ताप ही प्राथमिक लक्षणे आहेत. राज्यासह लगतच्या मध्य प्रदेशात या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
बॉक्स
‘आरएनए’ व्हायरसचे म्युटेशन जास्त
कोविड-१९ हा ‘आरएनए’ व्हायरस असल्याने म्युटेट होण्याची शक्यता जास्त आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळचा डेल्टा व्हेरिएंट आता म्युटेट झाल्यानंतर आता ‘प्लस’ व्हेरिएंट समोर आला आहे. याविषयी अधिक संशोधन येत्या आठवड्यात समोर येणार आहे. या विषाणूची जनुकीय तपासणी सुरू असल्याने जिल्ह्यातून १०० वर नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
बॉक्स
जिल्ह्यासही धोका, चिंता वाढली
राज्यात या नव्या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. याशिवाय लगतच्या मध्य प्रदेशातही या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्हा सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक संक्रमित रुग्ण जिल्ह्यात उपचारार्थ येत असल्याने या व्हेरिएंटचा धोका जिल्ह्यासदेखील आहे. दरम्यान, राज्यासह मध्य प्रदेशातदेखील प्रत्येकी एका संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
बॉक्स
डेल्टा प्लसमुळेच जिल्ह्यात निर्बंध
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. हा विषाणू घातक असल्यामुळेच चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार लेव्हल-१ मध्ये नोंद झालेल्या अमरावती जिल्ह्यात एका आठवड्यापूर्वी अनलॉक करण्यात आल्यानंतर आता २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोट
डेल्टा प्लससाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय २८ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी पंचसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
कोट
दर १५ दिवसांनी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला जिल्ह्यातील १५ सॅम्पल पाठविल्या जातात. याशिवाय राज्य शासनाच्या प्रकल्पांतर्गत दरमहा १२५ नमुने दिल्ली येथे तपासणीकरिता पाठविले जात आहे.
- डॉ. प्रशांत ठाकरे, समन्वयक, विद्यापीठ लॅब.
पाईंटर
आतापर्यंत कोरोनाग्रस्त : ००००००
एकूण संक्रमणमुक्त : ०००००
कोरोनाग्रस्तांचे मृत्यू : ०००००
सद्यस्थितीत ॲक्टिव्ह : ०००००