अमरावती : मात्र शेजारील अडते गोविंद टवानी यांनी वाहन ठेण्यास मज्जाव केल्याने रावसाहेब यांनी मला अडत्यांनी सांगितल्यानुसार वाहन उभे करीत असल्याचे म्हणाले. दरम्यान अडते गोविंदने कमरेचा पट्टा काढून मारण्यास सुरुवात केली, ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडल्याचे सांगण्यात आले. पट्ट्याने मारहाण होत असताना बाळू वानखडे नामक अडत्यानेदेखील रावसाहेबांना पकडून ठेवल्याची पोलिसात तक्रार आहे. हमाल संघटना एकवटल्याचे बघून गोविंद टवानी व बाळू वानखडे यांनी गाडगेनगर पोलिसात हल्ला केल्याची तक्रार नोंदविली. अडत्याने हमालास पट्ट्यांनी मारहाण करुन पोलिसात खोटी तक्रार देण्यास धाव घेतली, हे कळताच हमाल संघटनांचे सदस्य एकवटले. बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात हमालांनी अन्यायाविरुद्ध ठिय्या दिला. अडते टवानी, वानखडे यांच्यावर कारवाई तसेच परवाने रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका हमालांनी घेतली. अडते, हमालांच्या वादात माल तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांनी सभापती, उपसभापती, सचिवांकडे तोडगा काढण्याविषयी अवगत केले. त्यानंतर उपसभापती किशोर चांगोले, संचालक मिलिंद तायडे हे काही वेळाने बाजार समितीत दाखल झाले. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी संचालकांनी उपसभापतींच्या दालनात बंदद्वार चर्चा केली. यावेळी सभापती सुनील वऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु हमालास झालेल्या मारहाण प्रकरणी न्याय मिळालाच पाहिजे, ही भूमिका संचालक बंडू वानखडे यांनी घेतली. दरम्यान दोन दिवसांनंतर अडते टवानी आणि वानखडे यांच्यावर ठोस कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी हमालांनी पुकारलेले कामबंद तूर्तास मागे घ्यावे, अशी विनंती संचालकांनी हमाल संघटनांना केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजेनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू झाले. आंदोलनात हमाल संघटनेचे संतोष ससाने, विष्णू सावळे, रामा तांबे, रामेश्वर माहुरे, साहेबराव खंडारे, अशोक माने, मधुकर विघ्ने, बबन काळे, सुनील मंडवधरे, शिवा तायडे, अंबादास कांबळे, सोमनाथ कवटेकर, संजय शिंदे, आदिंनी पुढाकार घेतला होता.
परवाने रद्द करण्याची मागणी
By admin | Published: March 12, 2016 12:21 AM