गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने आता परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून ‘पीओएस’ मशीनद्वारेच अनुदानित केरोसीन वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे काळ्याबाजाराला चाप बसला. पश्चिम विदर्भात आॅगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात केरोसीनची मागणी तब्बल ७ लाख ६८ हजार लिटरने घटली आहे. गॅस जोडणीधारकांची खरी आकडेवारी मिळणे दुरापास्त असल्यामुळे पुरवठा विभागाने या मशीनद्वारेच केरोसीन वितरणाची पद्धती अवलंबली.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अनुदानित दराचे केरोसीन ५९ हजार ५३५ किरकोळ परवानधारक विक्रेत्यांद्वारा राज्यातील ८८ लाख रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येते. यामध्ये ३६ हजार दुकानांमधून फक्त केरोसीन, तर २३ हजार रेशन दुकानांमधून धान्यासोबत केरोसीन वितरित करण्यात येते. दरम्यान, शासनाने गॅस जोडणी नसलेल्यांनाच अनुदानित केरोसीन वाटपाचा निर्णय घेतला. मात्र, गॅस जोडणीधारकांची अचूक माहिती प्राप्त होत नसल्याने रेशन कार्डावरील स्टॅम्पिंग करण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे शासनाने आता पीओएस मशीनद्वारेच केरोसीन वितरणचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम ७.६८ लाख लिटर केरोसीन बचतीच्या रूपाने पुढे आला. रास्त भाव दुकानातील पीओएस मशीनवर कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला केरोसीनचे वितरण करण्यात येत आहे. आधार जोडणी झाली नसल्यास, त्याला ‘ईकेवायसी’ करून केरोसीनचे वितरण करण्यात येत आहे. शिधापत्रिकेची माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शासनप्रमाणित पर्यायी ओळखपत्राचा वापर करून केरोसीन वितरण करण्यात येत आहे.विभागात आता पीओएस मशीनच्या वापराने केरोसीन वाटप करण्यात येत आहे. यामुळे काळाबाजाराला चाप बसला. एका महिन्यात केरोसीनची ७.६८ लाख लिटरने बचत झाली आहे.- रमेश मावस्कर, विभागीय उपायुक्त (पुरवठा)केरोसीनच्या मागणीतली तुलनात्मक स्थिती (किलोलिटर)जिल्हा आॅगस्टचा कोटा सप्टेंबर मागणी बचतअमरावती ८४० ७२० १२०अकोला ५८८ १३२ ४५६वाशिम ३०० ३२३ -२६यवतमाळ ५५२ ४५६ ९६बुलडाणा ८२८ ७०८ १२०एकूण ३१०८ २३४० ७६८
पश्चिम विदर्भात केरोसीनच्या मागणीत सात लाख लिटरने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:21 PM
शासनाने आता परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून ‘पीओएस’ मशीनद्वारेच अनुदानित केरोसीन वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे काळ्याबाजाराला चाप बसला.
ठळक मुद्देपीओएस मशीनचा वापर रेशनच्या काळाबाजाराला चाप, बायोमेट्रिक ओळख