--------------------------
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारी
अमरावती : कुणाचा वयोवृद्धांना असलेला धोका लक्षात घेऊन कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने ईपीएस १९९५ द्वारे निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांनी आपले जीवन प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपर्यंत सादर केले नाही अशा ३५ लाख कर्मचाऱ्यांचे वेतन या वाढीव कालावधीत थांबविले जातील, असे कळविण्यात आले आहे.
-----------------------
भरधाव वाहनाची दोघांना धडक
अमरावती : कॉटन मार्केटनजीकच्या कॉसमॉस बँकेजवळ एमएच ४३ - १०६० क्रमांकाच्या वाहनाने एमएच ३१ ए ४२४६ क्रमांकाचे वाहन थांबवून मित्राशी बोलणाऱ्या हुकुमचंद रामदास यादव (४२ रा. विलासनगर) यांना जखमी करून वाहनांचे नुकसान केले. काही अंतरावर एम एच २७ एएन ३०७० क्रमांकाच्या वाहनाला धडक देऊन चालकाला जखमी केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९ ३३७ ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला. ३० नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजता ही घटना घडली.